वेल्लोर (तमिळनाडू) येथे लसीकरण शिबिरासाठी आलेल्या पथकातील महिला ख्रिस्ती डॉक्टरकडून मंदिरात चपला घालून प्रवेश !

  • ग्रामस्थांचा लसीकरण करण्यास विरोध !

  • ख्रिस्ती महिला डॉक्टर मंदिरातून बाहेर पडल्यानंतर ग्रामस्थांनी घेतली लस !

  • मुसलमानांच्या मशिदीमधील नियम तोडण्याचे ख्रिस्ती महिला डॉक्टर धारिष्ट्य करू शकते का ? हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करूनही धर्मांध ख्रिस्ती महिला डॉक्टर हिंदूंच्या धर्मभावनांचा अनादर करून मंदिरात चपला घालून प्रवेश करते, हे संतापजनक होय !

  • बहुतांश हिंदू सर्वधर्मसमभावानुसार वागण्याचा प्रयत्न करतात, तर अन्य धर्मीय हिंदूंचा द्वेष करतात आणि प्रदर्शित करतात !
गोल वर्तुळात मंदिरात चपला घालून बसणारी ख्रिस्ती महिला डॉक्टर रेजिना

वेल्लोर (तमिळनाडू) – येथील पोगोई गावामधील मुथलम्मन मंदिर परिसरात कोरोना लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. यासाठी आलेल्या वैद्यकीय पथकातील ख्रिस्ती महिला डॉक्टर रेजिना यांनी ग्रामस्थांनी सांगनूही मंदिरात जातांना चपला काढल्या नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी लसीकरणासाठी आलेल्या पथकाचा विरोध करत लस घेण्यास नकार दिला. ‘जोपर्यंत डॉ. रेजिना मंदिरातून बाहेर जात नाही, तोपर्यंत लस घेणार नाही’, असे ग्रामस्थांनी सांगितल्यानंतर डॉ. रेजिना मंदिरातून गेल्यानंतर ग्रामस्थांनी लस घेतली.

१. डॉ. रेजिना यांना ग्रामस्थांनी चपला काढण्यास सांगितल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘येथे कुठेही चपला काढून आत जा’, असा फलक लावण्यात आलेला नाही. (चर्चमध्ये गेल्यावर ‘येथे प्रार्थना करा’ अशा आशयाच्या सूचना लिहिल्या असतात का ? जसे चर्चमध्ये गेल्यावर काही अलिखित नियम पाळायचे असतात, त्याच प्रमाणे मंदिरांमध्ये ते पाळायचे असतात; मात्र धर्मांध ख्रिस्ती डॉक्टर हिंदुद्वेषापायी असली कारणे देत आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक)  कोरोनाच्या भीतीमुळे मी चपला काढत नाही.’’ ग्रामस्थांनी ते मानण्यास नकार दिला.

२. या वेळी हिंदु मोर्चाचे नेते आदि शिव हेही त्यांच्या समर्थकांसह घटनास्थळी पोचले. त्यानंतरही डॉ. रेजिना चपला काढण्यास किंवा मंदिरातून बाहेर येण्यास सिद्ध नव्हत्या. शेवटी वाढत्या विरोधामुळे त्या मंदिराबाहेर आल्या. त्यानंतर अन्य डॉक्टर आणि परिचारिका यांनी ग्रामस्थांची क्षमा मागितल्यावर ग्रामस्थांनी लस घेतली.