नागपूर येथे १७ मार्चला औरंगजेबाच्या कबरीच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. या प्रतिकृतीसह कुराणातील काही आयते जाळल्याचा कांगावा करत मुसलमानांनी दंगल घडवली. नागपूर दंगलीचा प्रश्न जेव्हा विधानसभेत उपस्थित करण्यात आला. त्या वेळी ‘सत्ताधारी पक्षातील एकतरी आमदार या दंगलीची भीषणता, भयावहता, धर्मांधता सभागृहात मांडतील’, अशी अपेक्षा होती. नागपूरमधील दंगलीमध्ये महिला पोलिसांवर हात टाकला गेला. पोलिसांवर कुर्हाड आणि तलवारीने वार केले गेले. नागपूरचे पोलीस उपायुक्तही आक्रमणात घायाळ झाले. दंगलखोरांनी पेट्रोल बाँब वापरले. ही दंगलीची भीषणता सभागृहात ओझरती आली. ‘दंगलीची ही भीषणता काँग्रेसचे आमदार मांडतील’, अशी अपेक्षा हिंदूंनी ठेवावी का ? सत्ताधारी पक्षाचे आमदार धर्मांधांचा नंगानाच सभागृहात मांडत नाहीत, हे हिंदूंना अपेक्षित नाही.

१. लांगूलचालन न करता औरंगजेबी वृत्तीला गृहविभागाने उघडपणे ठेचावे !
छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा कोथळा काढल्याच्या फलकाला काँग्रेसच्या काळात धर्मांध मुसलमानांनी विरोध केला होता. हे चित्र लावणार्यांवर पोलीस दबाव आणायचे. लांगूलचालनाची ही राष्ट्रघातकी प्रथा काँग्रेसप्रमाणे शिवसेना-भाजप जोपासणार नाही, हे जरी असले, तरी याविषयी महायुतीकडून नरमाई हिंदूंना अपेक्षित नाही. औरंगजेबी वृत्तीला जोपासणार्या वृत्तीला गृहविभागाने उघडपणे ठेचावे आणि गृहमंत्र्यांनी याची ललकार ‘डंके की चोटपर’ सांगावी, असे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित आहे.

२. …किमान पोलिसांच्या अब्रूची लाज तरी सरकारने राखावी !
विधानसभेत दंगलीच्या प्रकरणातील कारवाईची माहिती देतांना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर आक्रमण करणार्यांना सोडणार नसल्याची चेतावणी दिली. अशीच दंगल वर्ष २०१२ मध्ये आझाद मैदानात नियोजनबद्धरित्या आणि अगदी अशाच प्रकारे घडवण्यात आली. म्यानमारमध्ये मुसलमानांवर अत्याचार झाल्याचा कांगावा करत मुसलमानांनी महाराष्ट्रात मोर्चा काढला इथपर्यंत ठीक होते; मात्र त्या आडून येथे मुसलमानांनी नियोजनबद्ध दंगल घडवली. ‘मोर्चाला १ सहस्र लोक येतील’, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मोर्चाला १५ सहस्रांहून अधिक मुसलमान आले. पेट्रोल बाँब, सळ्या यांद्वारे पोलिसांवर आक्रमण केले. महिला पोलिसांचे कपडे फाडले, वृत्तवाहिनींच्या व्हॅनची तोडफोड केली. महाराष्ट्रातील महिला पोलिसांना अपमानित करणार्या, त्यांची मानहानी करणार्या या धर्मांधांना १२ वर्षांनंतरही शिक्षा होणे सोडा, अद्याप याचा खटलाही न्यायालयात चालू झालेला नाही. दंगलखोर ६१ धर्मांध मुसलमानांची ओळख पटवण्यात येऊनही त्यांच्याकडून हानीभरपाई वसूल करण्याचा पुरुषार्थ गृहविभागाला अद्यापही दाखवता आलेला नाही. उलट दंगलीतील सहभागी असलेल्या एका धर्मांधाच्या विरोधात पुरावे सादर न करता आल्याने त्याचे नाव आरोपपत्रातून वगळण्याची नामुष्की पोलिसांवर आली. एकीकडे रक्षाबंधनाच्या दिवशी महिला पोलिसांच्या हातून राख्या बांधून घेण्याचा कार्यक्रम करायचा; मात्र महिला पोलिसांच्या अब्रूला हात घालणार्यांना शिक्षा करायची नाही, हे कसले रक्षाबंधन ? रक्षाबंधन, भाऊबीज वगैरे भावनिकता राहू दे, किमान महाराष्ट्र पोलिसांच्या अब्रूची लाज तरी सरकारने राखावी. वर्ष २०१२ पासून महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या सर्वपक्षीय नेत्यांना याचा जाब जनतेने विचारायला हवा.
३. धर्मांधांचे दंगली करण्याचे धाडस वाढणे, ही गृहविभागाची नामुष्की !
पोलिसांवर हात उगारणार्यांवर गृहविभागाचा धाकच नाही. महिला पोलिसांच्या अब्रूवर हात उगारणार्यांना वचक बसवण्याची गोष्ट तर पुष्कळ दूर राहिली. ही धमक नसल्यामुळे कोरोना महामारीच्या काळात १-२ नव्हे, तर वाहतूक पोलिसांवर धर्मांधांनी किती आक्रमणे केली, याचे ‘सीसीटीव्ही’चे चित्रण राज्याचे पोलीस महासंचालक आणि गृहमंत्री यांनी अवश्य पहावेत अन् याचे गांभीर्य ओळखावे.
आझाद मैदानातील दंगलीमध्ये ज्या पोलीस महिलेची विजार धर्मांधांनी ओढली, ज्या महिला पोलिसाचे शर्ट खेचल्यामुळे शर्टाची बटणे तुटली आणि त्या महिलेला बाजूच्या दुकानदाराने दिलेला शर्ट घालून अबू्र लज्जा राखावी लागली, त्यांचे जबाबही अवश्य वाचावेत. ‘आम्ही पोलिसांनाही जुमानत नाही’, असे दर्शवणारा हा उद्दामपणा आहे. या उद्दामपणाला आणि धाडसाला वेळीच चाप बसला असता, तर कदाचित् महाराष्ट्रातील अमरावती, पुणे, नागपूर येथे दंगली झाल्या नसत्या; मात्र आझाद मैदान दंगलीनंतर धर्मांधांचे धाडस आणखी वाढले आणि त्याचे परिणाम आता दिसत आहेत. ही गृहविभागाची नामुष्की होती.
४. …आतातरी सुधारणा होईल, ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !
राष्ट्र्रद्रोहाच्या विरोधात वेळीच कारवाई जितकी महत्त्वाची, तितकीच या वृत्तींना त्याची जरबही तितकीच महत्त्वाची ठरते. आझाद मैदानाच्या दंगलीनंतर जरी जरब बसवता आली नसली, तरी नागपूर दंगलीनंतर तरी यामध्ये सुधारणा होईल, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सूज्ञ, कणखर आणि समर्थ आहेत. त्यामुळे सरकारने ‘बॅकफूट’वर (मागे न जाता) नव्हे, तर ‘फ्रंटफूट’वर (पुढे पाऊल टाकत) येऊन कारवाई करावी एवढेच !
– श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’, मुंबई. (२०.३.२०२५)