दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुंबई आवृत्तीच्या २५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने विशेष लेखमाला !
जागतिक कीर्तीच्या नावलौकिकतेच्या आडून भारतमाता आणि हिंदूंच्या देवता यांची नग्न, बिभत्स अन् विकृत चित्रे काढणार्या म.फि. हुसेन यांचा हिंदुद्रोहीपणा दैनिक ‘सनातन प्रभात’ने उघड केला. म.फि. हुसेन हा इतका विकृत होता की, त्याने ‘रेप ऑफ इंडिया’ असे विकृत चित्र काढले. दैनिक ‘सनातन प्रभात’ने म.फि. हुसेन याची धर्मांधता उघड केली.
हिंदूंमध्ये जागृती !
कलेच्या आडून हिंदूंच्या देवतांची विटंबना करणार्या या धर्मांधाचे खरे स्वरूप उघड झाल्यावर देशभरातील हिंदूंमध्ये संतापाची लाट पसरली. देशभरात म.फि. हुसेन याच्या विरोधात आंदोलन उभे झाले. हिंदु जनजागृती समितीने यामध्ये पुढाकार घेतला. परिणामी म.फि. हुसेन याच्या विरोधात देशभरात १ सहस्र २०० हून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या. राष्ट्रप्रेमींचा विरोध इतका तीव्र होता की, केरळ शासनाने त्याला घोषित केलेला ‘राजा रवि वर्मा पुरस्कार’, तसेच ‘रूपधर जीवनगौरव पुरस्कार’ आणि दुबई येथे देण्यात येणारा ‘भोरूका ट्रस्ट’चा पुरस्कार आदी घोषित करण्यात आलेले अनेक पुरस्कार रहित करण्यात आले. देशभरात आयोजित करण्यात आलेली त्यांच्या शेकडो चित्रांची प्रदर्शने राष्ट्रप्रेमींच्या विरोधामुळे रहित करण्यात आली.

भारतातून पलायन !
म.फि. हुसेन याच्या विरोधात संतापाची लाट इतकी तीव्र झाली की, वर्ष २०१० मध्ये तो भारत सोडून कतार देशात पळून गेला. कतार येथेच २०११ मध्ये त्याचे निधन झाले. त्याच्या निधनानंतरही देशात विविध ठिकाणी हुसेन याच्या चित्रांचे प्रदर्शन लावल्यास राष्ट्रप्रेमी नागरिकांकडून अजूनही तीव्र विरोध केला जातो.
व्यक्ती कितीही मोठी असली, तरी तिला राष्ट्र आणि धर्म द्रोह करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. एका नावाजलेल्या व्यक्तीच्या विरोधातील लढा, म्हणजे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रखर राष्ट्रीयत्वाच्या पत्रकारितेचे उदाहरण होय.
– श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’, मुंबई. (१७.३.२०२५)