दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुंबई आवृत्तीच्या २५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने विशेष लेखमाला !
‘सनातन प्रभात’ नियतकालिकांची पत्रकारिता समाजाभिमुख आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून विविध सामाजिक, धार्मिक क्षेत्रांतील अपप्रवृत्तींच्या विरोधात ‘सनातन प्रभात’ने सातत्याने आवाज उठवला. शोध पत्रकारितेद्वारे ‘सनातन प्रभात’ने भ्रष्टाचार उघड केला. ‘सनातन प्रभात’मधील सत्य आणि वस्तूनिष्ठ वृत्तांकनामुळे अपप्रवृत्तींना प्रतिबंध बसला. या वृत्तांकनाचे उमटलेले पडसाद दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुंबई आवृत्तीच्या २५ व्या वर्धापनदिनाच्या या विशेष लेखमालेद्वारे दिले आहेत.
देव, धर्म, श्रद्धा मानत नसलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या नास्तिकतावाद्यांच्या नादी लागून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने महाराष्ट्रात ‘कथित अंधश्रद्धा निर्मून कायद्याचे विधेयक आणले. ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या गोंडस नावाच्या आडून हिंदु धर्मावर घाला घालण्याचे या मंडळींचे षड्यंत्र होते; मात्र एका सज्जन आणि दक्ष योद्ध्याप्रमाणे दैनिक ‘सनातन प्रभात’ने हा प्रकार उघड केला. वारीला जाणे, बाळाचे कान टोचणे, श्री सत्यनारायणाचे व्रत करणे हे या कायद्याद्वारे गुन्हा ठरणार होते. या विधेयकातील हिंदु धर्मविरोधी कलमांची दैनिक ‘सनातन प्रभात’ने पोलखोल केली.

सलग १० वर्षे विषय लावून धरणे आणि राज्यव्यापी आंदोलन उभे रहाणे !
वर्ष २००३ मध्ये आघाडी सरकारने हे विधेयक अध्यादेशासाठी राज्यपालांकडे पाठवले. राज्यपालांनी स्वाक्षरीसाठी नकार दिल्यावर वर्ष २००४ मध्ये आघाडी सरकारने हे विधेयक विधानसभेत मांडले. त्या वेळी शिवसेना-भाजप युतीच्या आमदारांनी याला जोरदार विरोध केला. दैनिक ‘सनातन प्रभात’ने सलग १० वर्षे हा लावून मोठी जनजागृती केली. ‘समाजाभिमुख पत्रकारिते’चे हे एक उत्तम उदाहरण होय. वारकरी संप्रदाय, हिंदु जनजागृती समिती यांसह विविध संघटनांनी या कायद्याच्या विरोधात जनआंदोलन उभारले. महाराष्ट्रभर ठिकठिकाणी या कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. परिणामी या कायद्यातील २७ कलमांपैकी हिंदु धर्मावर आघात करणारी १५ कलमे सरकारला हटवावी लागली.
पत्रकारिता क्षेत्रात सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्यासारखे योगदान !
पत्रकारितेच्या माध्यमातून हिंदु धर्माविरोधातील मोठ्या आघाताच्या विरोधात दैनिक ‘सनातन प्रभात’ एका योद्ध्यासारखा पाय रोवून उभा राहिला. हिंदूंपर्यंत विषय पोचवणे, त्यांच्यातील धर्माभिमान जागृत करणे आणि धर्महानी विरोधात सनदशीर मार्गाने लढा देण्यास प्रवृत्त करणे, हे पत्रकारितेच्या क्षेत्रात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवता येईल, असे योगदान ठरले.