आर्यन खानच्या निर्दोष मुक्ततेला हिंदु महासंघाकडून उच्च न्यायालयात आव्हान !

हिंदु महासंघाचे संस्थापक श्री. आनंद दवे, अधिवक्ता सुबोध पाठक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेत मनोज तारे, प्रीतम देसाई उपस्थित होते.

तुळजापूर येथे शिवरायांना भवानी तलवार देतांनाचे १०८ फुटी शिल्प उभारणार ! – राणा जगजितसिंह पाटील, आमदार, भाजप

छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असलेल्या श्री तुळजाभवानीमातेचे १०८ फुटी शिल्प तुळजापूर येथे उभारण्यात येणार आहे. यासाठी २५० कोटी रुपये व्यय करण्यात येणार आहे. या निधीमध्ये लोकसहभागही असणार आहे

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘माफीवीर’ म्हणून हिणवणारे राहुल गांधी यांनी फाळणीसाठी उत्तरदायी असणार्‍या नेहरूंविषयीचे सत्य बोलण्याचे धारिष्ट्य दाखवावे !

राहुल गांधी यांच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे इंग्रजांसाठी काम करत होते’, या आरोपावरील श्री. रणजित सावरकर यांचा रोखठोक प्रतिवाद !

सातारा येथे ४ डिसेंबर या दिवशी भव्य ‘हिंदु जनआक्रोश’ मोर्चा !

या मोर्च्याचा उद्देश आणि अन्य माहिती सांगण्यासाठी २ डिसेंबर या दिवशी सातारा येथील विश्रामगृहामध्ये विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषद घेतली.

वाहनांची चोरी करणार्‍याला नालासोपारा पोलिसांकडून अटक

दुचाकी आणि रिक्शा यांची चोरी करणार्‍या संजय यादव या आरोपीला नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून पोलिसांनी ७ गुन्ह्यांची उकल करून चोरीच्या ४ दुचाकी आणि ३ रिक्शा हस्तगत करण्यात आल्या आहेत…

मनसे मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार ! – राज ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

पक्षाच्या बळकटीकरणासाठी विभागनिहाय दौरे चालू आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढवणार आहे, अशी माहिती अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत दिली.

हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी रत्नागिरीत ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ ! – विनोद गादीकर, हिंदु जनजागृती समिती

मंदिरांचे सरकारीकरण, लव्ह जिहाद, हलाल जिहाद’ यांसारख्या हिंदूवर होणार्‍या नित्य आघातांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे, हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.

भोसरी (पुणे) येथे कामधेनू महोत्सव अर्थात् ‘विश्व गोपरिषद २०२२’चे आयोजन !

भोसरी येथील गोधाम (पांजरपोळ) येथे २४ आणि २५ डिसेंबर या दिवशी जनमित्र सेवा संघ आणि विविध सहयोगी सदस्य संस्था यांच्या वतीने गो आधारित आत्मनिर्भर ग्राम असे उद्दिष्ट ठेवून कामधेनू महोत्सव अर्थात् ‘विश्व गोपरिषद २०२२’ आयोजित करण्यात आलेली आहे..

गोतस्करी वाढल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन करू !

अमरावती गोरक्षण संस्था अंतर्गत ‘पशूधन बचाओ समिती’ची चेतावणी !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि राहुल गांधी यांचा दिसून येणारा फोलपणा !

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांचा खोटारडेपणा उघड केला. त्या पत्रकार परिषदेतील काही निवडक भाग येथे प्रसिद्ध करत आहोत.