भारतीय राजनैतिक कार्यालयांवर झालेल्या आक्रमणांचा निषेध करतो ! – अमेरिका

वाशिंगटन (अमेरिका) – अमेरिकेत नुकतेच भारतीय राजनैतिक कार्यालयाच्या ठिकाणी झालेल्या हिंसेचा आम्ही निषेध करतो. आम्ही निदर्शने करणार्‍यांच्या अधिकारांचे समर्थन करतो; मात्र हिंसा किंवा हिंसेचा धोका याला कधीही स्वीकारू शकत नाही, असे विधान अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे उप प्रवक्ता वेदांत पटेल यांनी पत्रकार परिषदेत केले. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय दूतावासावर खलिस्तान्यांनी केलेल्या आक्रमणावर विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावर उत्तर देतांना पटेल यांनी वरील विधान केले. भारताने या आक्रमणावरून अमेरिककडे निषेध नोंदवला होता.

संपादकीय भूमिका 

नुसते तोंडी निषेधाचे बुडबुडे न सोडता आक्रमण करणार्‍या, तसेच भारताच्या विरोधात कारवाया करणार्‍या खलिस्तान्यांवर अमेरिकेने कारवाई करून त्यांना कारागृहात डांबण्याची कृती करावी !