पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचा निर्णय
पिंपरी (पुणे) – पिंपरी शहरात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, नवी सांगवी, चिखली आणि आकुर्डी परिसरांतील रस्त्यांवर ८८८ खड्डे आढळले आहेत. मागील वर्षी रस्ता झाला आणि पावसाळ्यामध्ये त्यावर खड्डे पडले, तर कंत्राटदार, उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांच्यावर त्याचे दायित्व निश्चित केले जाणार असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
जुलैमध्ये झालेल्या पावसाने पडलेले खड्डे महापालिका प्रशासनाने बुजवले; परंतु गेल्या सप्ताहामध्ये झालेल्या पावसामुळे भरलेले खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत, तसेच यंदा रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण अधिक असल्याचेही महापालिका प्रशासनाने मान्य केले आहे. आता २ दिवसांपासून पाऊस थांबल्यामुळे खड्डे बुजवण्याचे काम चालू आहे. (एका पावसात रस्त्यांवर खड्डे कसे पडतात ? या प्रश्नाच्या मुळाशी प्रशासन का जात नाही ? त्यामुळे या कामात भ्रष्टाचार तर होत नाही ना ? अशी शंका आल्यास चूक ते काय ? – संपादक)
संपादकीय भूमिकारस्त्यावर खड्डे पडल्यानंतर उपाययोजना काढण्यापेक्षा रस्ते बांधणीच्या कामातील निकृष्टपणा टाळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे ! प्रशासन याकडे लक्ष देईल का ? |