मुख्यमंत्र्यांकडून मुंबई-गोवा महामार्गाची पहाणी !

गणेशोत्सवापूर्वी दुरुस्ती पूर्ण करण्याचा आदेश !

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २६ ऑगस्ट या दिवशी मुंबई-गोवा महामार्गाची पहाणी केली. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी ‘रॅपिड क्वीक सेटिंग हाडॅनर’ या आधुनिक पद्धतीचा उपयोग करून गणेशोत्सवापूर्वी महामार्गाची दुरुस्ती पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.


मागील काही वर्षांपासून गणेशोत्सवापूर्वी लोकप्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गाची पहाणी करून तात्पुरती रस्त्यांची दुरुस्ती करत आहेत. मागील वर्षीही गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले होते; मात्र ऐन गणेशोत्सवात बुजवलेले खड्डे पुन्हा उकरले गेले. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणार्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागला. मागील १५ वर्षांपासून या महामार्गाचे काम रखडले आहे.