पिंपरी-चिंचवडमध्ये ८० टक्के खड्डे बुजवले ! – महापालिका

रस्त्यांवरील खड्डे

पिंपरी (पुणे) – पिंपरी-चिंचवड शहर परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. शहरातील विविध रस्त्यांवर २ सहस्र ३ खड्डे आढळून आले. त्यातील १ सहस्र ५८० खड्डे बुजवले असून केवळ ४२३ खड्डे असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम म्हणाले, ‘‘पावसामुळे डांबरीकरण करणे शक्य होत नाही. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे मुरूम, खडी आणि सिमेंट काँक्रीटने बुजवले जातात. पावसाळा संपल्यानंतर सर्व खड्यांमध्ये पुन्हा नव्याने डांबर भरण्यात येणार आहे.’’