पुणे शहरात प्रदूषण नियंत्रणात ठेवण्‍यासाठी महापालिका २० ठिकाणी पाण्‍याची कारंजी उभारणार !

पुणे – पुणे, मुंबईसह राज्‍यातील अनेक शहरांतील प्रदूषणाची पातळी वाढून नागरिकांचे आरोग्‍य धोक्‍यात आले आहे. ढासळणार्‍या हवेच्‍या गुणवत्तेविषयी चिंता व्‍यक्‍त करून महापालिकांना उपाययोजना करण्‍याच्‍या सूचना मुंबई उच्‍च न्‍यायालयाने केल्‍या. महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मिळालेल्‍या मार्गदर्शक सूचनांवरून महापालिका प्रशासनाकडून उपाययोजनांना प्रारंभ करण्‍यात आल्‍या आहे. अती रहदारीच्‍या ठिकाणी पाण्‍याचे कारंजे उभारण्‍याचे नियोजन असून पहिल्‍या टप्‍प्‍यात २० ठिकाणी कारंजी उभारण्‍यात येतील. त्‍यातून धुळीचे प्रदूषण नियंत्रणात राहील, असे महापालिकेचे म्‍हणणे आहे.

प्रदूषण नियंत्रणात ठेवण्‍यासाठी नैसर्गिक इंधनावरील (सी.एन्.जी.) आणि विजेवर (इलेक्‍ट्रीक) धावणारी वाहने खरेदीचे धोरण महापालिकेने स्‍वीकारले आहे. प्रवासी रिक्‍शांचे सी.एन्.जी.मध्‍ये रूपांतर करण्‍यासाठी महापालिका प्रोत्‍साहन निधी देत आहे. (श्री गणेशमूर्तींच्‍या विसर्जनामुळे प्रदूषण होते, अशी ओरड करणारे या प्रदूषणाविषयी कृती का करत नाहीत ? – संपादक)