बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याची अमानुष मारहाण करून हत्या

गेल्या काही वर्षांत अशा प्रकारच्या अनेक घटना घडूनही नेहमी लोकशाहीच्या रक्षणाच्या गप्पा मारणारे राजकीय पक्ष यांवर मौन का बाळगून आहेत ? बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या होणार्‍या हत्यांमुळे त्यांना आनंद मिळतो का ?

जम्मू-काश्मीरमध्ये टोल नाक्यावरील चकमकीत ४ आतंकवादी ठार

जोपर्यंत आतंकवाद्यांचा कारखाना असणार्‍या पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमध्ये अशा चकमकी होऊन आतंकवादी ठार होत रहाणार आणि नवीन आतंकवादी निर्माण होत रहाणार !

कंगना राणावत यांना पोलिसांकडून तिसर्‍यांदा समन्स

कंगना आणि त्यांची बहीण रंगोली यांच्या विरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा नोंद झाला असून त्या संदर्भात तिसर्‍यांदा पोलिसांनी समन्स बजावले आहे. सामाजिक माध्यमांवर केलेल्या आक्षेपार्ह ट्वीटच्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

विरोधानंतरही दवर्ली, मडगाव येथे रेल्वेमार्ग दुपदरीकरणाचे काम चालूच

रेल्वेमार्ग दुपरीकरणाच्या विरोधात राज्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जात असूनही या विरोधाला डावलून रेल्वेमार्ग दुपदरीकरणाचे काम चालू झाले आहे. दवर्ली, मडगाव येथे रेल्वे फाटकाजवळील बांधकाम तोडून या कामाला प्रारंभ झाला आहे.

राष्ट्रघातकी काँग्रेस !

भारत जिहादी आतंकवादाच्या विरोधात लक्ष्यभेद करण्याचे धाडस दाखवत नाही, हेच सत्य आहे. अर्जुनाला माशाचा डोळाच दिसत होता, आताच्या लोकांना केवळ मासाच दिसतो आणि त्यांचे बाण अन्यत्रच लागत आहेत. त्यामुळे जे साध्य करायचे आहे, ते होत नाही. ही स्थिती पालटली पाहिजे.

पाकला नष्ट केल्यावरच काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार !

नगरोटा (जम्मू-काश्मीर) येथे १९ नोव्हेंबरच्या पहाटे बान टोल नाक्यावर आलेल्या एका ट्रकमधून आतंकवाद्यांनी सुरक्षादलांवर गोळीबार केला. या वेळी ३ घंटे झालेल्या चकमकीत ४ आतंकवादी ठार झाले.

अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथे बनावट नोटाप्रकरणी एकास अटक

२ युवक चारचाकी वाहनामध्ये बसून दोनशे आणि पन्नास रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणत होते.

मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या नेत्याच्या घरातून मोठा शस्त्रसाठा जप्त

मध्यप्रदेश काँग्रेस समितीचे माजी सचिव गजेंद्र सोनकर यांच्या घरावर पोलिसांनी घातलेल्या धाडीतून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. रासुका’खाली कारवाई होण्याची शक्यता आहे. २ वर्षे जामीन मिळू शकत नाही.

महिलांसाठी असुरक्षित महाराष्ट्र !

दळणवळण बंदीच्या काळातही हिंदु जनजागृती समिती ठिकठिकाणी ‘ऑनलाईन’ प्रशिक्षण वर्ग, युवती शौर्यजागृती व्याख्याने आयोजित करते. त्याचा महिला-युवती यांनी लाभ घ्यायला हवा. महिलांनी प्रशिक्षण शिकून स्वतःचे रक्षण स्वतःच करणे, ही काळाची आवश्यकता आहे !

ठार बहिरे झालेले पोलीस !

जुहू येथील ७२ वर्षीय नागरिक प्रकाश चौधरी यांनी गंगाधर पिलाजी चौधरी मार्ग येथे १६.११.२०२० या दिवशी सायंकाळी ७ वाजल्यापासून ११.३० वाजेपर्यंत आवाजी आणि वायू प्रदूषण करणारे फटाके सातत्याने फुटत असल्याचे सांगितले.