कंगना राणावत यांना पोलिसांकडून तिसर्‍यांदा समन्स

मुंबई – कंगना आणि त्यांची बहीण रंगोली यांच्या विरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा नोंद झाला असून त्या संदर्भात तिसर्‍यांदा पोलिसांनी समन्स बजावले आहे. सामाजिक माध्यमांवर केलेल्या आक्षेपार्ह ट्वीटच्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.