पाकव्याप्त काश्मिरींना स्वातंत्र्य कधी मिळणार ? – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील लोक आतंकवाद आणि फुटीरावाद यांचे बळी ठरत आहेत. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. ते सध्या भारताकडे आशेने पहात आहेत.

पाकव्याप्त काश्मीरमधील जिहादी आतंकवादी वारसा हक्कातून मिळालेली संपत्ती विकून करत आहेत अर्थपुरवठा !

काश्मीरमधील प्रशासनामध्ये जिहादी आतंकवाद्यांचा भरणा असेल, तर तेथील आतंकवाद नष्ट कसा होणार ? काश्मीरमधील जिहादी आतंकवाद समूळ नष्ट करण्यासाठी  तेथील प्रशासन ‘आतंकवादप्रेमी’ मुक्त करा !

भारताचा अपप्रचार करण्यासाठी पाककडून युरोपमध्ये व्यापक स्तरावर प्रयत्न !

पाक डावपेचात भारतापेक्षा हुशार ! आतंरराष्ट्रीय स्तरावर भारताची मानहानी करणार्‍या पाकला भारताने आता तरी धडा शिकवावा !

पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान चीनला देण्याच्या सिद्धतेत !

असे झाल्यास भारताला चीनपासून आधीच असलेला धोका आणखी वाढेल. अशा कुरापतखोर पाकला भारत कसा धडा शिकवणार आहे ?

गांधीवादी नव्हे, प्रखर राष्ट्रवादी !

भारतानेही इस्रायलप्रमाणे प्रखर राष्ट्रवाद जोपासला असता, तर पाकव्याप्त काश्मीरचे सूत्र संयुक्त राष्ट्रापुढे नेण्याची वेळ आली नसती आणि आतापर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारताच्या अधीन असता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताने स्वत:ची प्रतिमा निश्चित सांभाळावी; परंतु ही प्रतिमा ‘गांधीवादी’ म्हणून नव्हे, तर ‘प्रखर राष्ट्रवादी’ असावी !

…तर काश्मीर भारतात विलीन करण्याविषयी आमचा निर्णय वेगळा असता ! – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला

आज काश्मीरच्या ज्या भागावर पाकचे नियंत्रण आहे, तेथील काश्मिरी मुसलमानांचे अस्तित्व नष्ट केले जात आहे, याविषयी ओमर अब्दुल्ला का बोलत नाहीत ?

महाराष्ट्रात पूर्वी भाजपचे सरकार असतांना मशिदींवरील भोंगे का हटवले नाहीत ? – प्रवीण तोगाडिया, अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद

‘‘आताही ज्या राज्यात भाजपचे सरकार आहे, त्या राज्यांत जिल्हाधिकार्‍यांना आदेश देऊन नियमानुसार भोंगे का हटवले जात नाहीत ?’’

काश्मीरमध्ये शारदादेवी मंदिराच्या उभारणीला आरंभ !

शेकडो वर्षांपासूनची तीर्थयात्रेची परंपरा पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न ! मंदिरांच्या उभारणीसमवेत त्यांचे कायमस्वरूपी रक्षण होण्यासाठी जिहादी आतंकवादाच्या विरोधात प्रभावी उपाययोजना आखणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, असे हिंदूंना वाटते !

भाजप पाकव्याप्त काश्मीरही स्वतंत्र करील ! – केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह

ही राष्ट्रप्रेमींची फार पूर्वीपासूनची इच्छा असल्यामुळे ती लवकरात लवकर पूर्ण करावी, असेच राष्ट्रप्रेमींनी वाटते !

भारत ‘पाकव्याप्त काश्मीर’ आणि ‘अक्साई चीन’ ताब्यात घेऊ शकतो का ?

अनेकांना वाटते की, ज्या प्रकारे रशियाने युक्रेनवर आक्रमण केले, त्याप्रमाणे भारतानेही पाकिस्तानच्या कह्यात असलेला ‘पाकव्याप्त काश्मीर’ आणि चीनच्या कह्यात असलेला ‘अक्साई चीन’ यांवर आक्रमण करून त्यांना कह्यात घ्यावे. सैनिकीदृष्ट्या हे शक्य असले, तरी यात अनेक आव्हाने आहेत.