विद्यार्थिंनी आणि शिक्षिका यांना हिजाब परिधान करणे बंधनकारक

पाकव्याप्त काश्मीर सरकारने नुकत्यात काढलेल्या एका आदेशात तेथील शाळा आणि महाविद्यालये यांत शिकणार्‍या विद्यार्थिंनी अन् शिक्षिका यांना हिजाब परिधान करणे बंधनकारक केले आहे.  सरकारच्या या आदेशाचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी देण्यात आली आहे.

पाकमध्ये खंडित वीजपुरवठा पूर्ववत चालू होण्यासाठी लोक रस्त्यावर !

पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान येथील लोक गव्हाचे पीठ, डाळी यांच्या किमती कमी व्हाव्या आणि खंडित झालेला वीजपुरवठा पुन्हा चालू व्हावा, यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.

(म्हणे) ‘वर्ष २०२१ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये जाणार होते !’

भारत सरकारने वारंवार पाकिस्तानचा आतंकवादी चेहरा जगासमोर आणला आहे. त्यामुळे ‘पंतप्रधान मोदी यांची अपकीर्ती करण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात आहेत का ? हे लक्षात घेऊन याला प्रत्युत्तर देणे आवश्यक !

इस्लामी देशांच्या संघटनेचे महासचिव पाकव्याप्त काश्मीरच्या दौर्‍यावर !

इस्लामी देशांना सध्या अनेक समस्या भेडसावत आहेत. त्या सोडवण्याऐवजी काश्मीर समस्येत नाक खुपसणार्‍या इस्लामी देशांच्या संघटनेला समजेल, अशा भाषेत भारताने उत्तर देणे आवश्यक !

पाकव्याप्त काश्मीर परत घ्या !

भारतीय नागरिक आता थेट संरक्षणमंत्र्यांकडे उघडपणे ही मागणी करू लागणे,  हे ते जागृत झाल्याचेच लक्षण आहे ! ही भारतियांसाठी उत्साहाची घटना आहे. आता त्यांनी सरकारवर दबाव आणून सरकारला पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यास भाग पाडले पाहिजे !

आदेश मिळाल्यास मागे वळून पहाणार नाही ! – लेफ्टनंट जनरल ए.डी.एस्. औजला

भारतीय सैन्याला पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याचा आदेश देण्यात काय अडचण आहे, हे जनतेला समजले पाहिजे !

पाकिस्तानने पुन्हा पाकव्याप्त काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर निर्माण केले आतंकवाद्यांचे तळ

भारताने आक्रमण झाल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक सारखी कारवाई करू नये. त्यातून काही काळापुरता थोडासा परिणाम होतो. त्यामुळे संपूर्ण पाकलाच धडा शिकवण्यासाठी प्रयत्न करावा !

पाकव्याप्त काश्मीरला प्रांताचा दर्जा देणारे संशोधन विधेयक पाकने घेतले मागे !

स्वत:च्या उत्कर्षासाठी भारताची स्वायत्तता स्वीकारण्यातच पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेचे हित आहे. भारताने कूटनीतिक मार्गांनी हे तिला पटवून देणे आवश्यक आहे !

पाकने आमच्या पाठीत सुरा खुपसला ! – नागरिकांचा आरोप

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाक सरकारने राज्यघटनेत १५ वी सुधारणा लागू केली आहे. या सुधारणेद्वारे पाकने पाकव्याप्त काश्मीरच्या आधी ‘स्वतंत्र’ असा शब्द जोडला आहे.

(म्हणे) ‘पाकव्याप्त काश्मीर स्वतंत्र आहे, तर भारतातील काश्मीरमध्ये सर्वत्र सशस्त्र पोलीस !’

असे विधान केल्याच्या प्रकरणी जलील यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहातच टाकायला हवे !