कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने पुण्यातील सार्वजनिक छठ पूजेस बंदी

भाविकांनी छठ पूजा घरगुती पद्धतीने खासगी जागेत साजरी करावी असे आवाहन पालिकेने केले आहे.

संयुक्त अरब अमिरातकडून पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणे बंद

संयुक्त अरब अमिरातने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि इतर ११ देशांतील नागरिकांना नव्याने व्हिजिट व्हिसा देणे बंद केले आहे.

देहलीमध्ये मास्क न वापरणार्‍यांना आता २ सहस्र रुपयांचा दंड होणार

देहलीमध्ये गेल्या २४ घंट्यांमध्ये ७ सहस्र ४८६ नवे रुग्ण आढळले. त्यानंतर आता देहली सरकारने देहलीत मास्क न घालणार्‍यांना २ सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्याची घोषणा केली. यापूर्वी ५०० रुपयांचा दंड होता.

राज्यातील शाळा चालू करण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाला काळजी घेण्याच्या सूचना

शाळांना सॅनिटायझर, थर्मलगन, ऑक्सिमीटर अशा आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात स्थानिक प्रशासनाने सहकार्य करावे

पुणे येथे फटाक्यांमुळे प्रदूषणाच्या पातळीत वाढ !

कोरोनामुळे दिवाळीत फटाके फोडणे अत्यंत धोकादायक असल्याची जनजागृती केली होती.

भोगावती नदीला दूषित पाणी, मृत माशांचा खच

भोगावती नदीला दूषित पाणी आल्याने नदीपात्रात मासे मृत्यूमुखी पडू लागले आहेत.

कोरोनानंतर आता ‘चापरे’ विषाणूचा धोका

चापरेची बाधा झाल्यास कोरोना अथवा इतर तापाच्या आजारापेक्षा या आजाराची लक्षणे लवकर आढळून येतात.

सिंधुदुर्गात कोरोनामुळे आतापर्यंत १३७ जणांचा मृत्यू

गेल्या २४ घंट्यांत जिल्ह्यात १३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ५ सहस्र १०३ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या ४ सहस्र ७९९ आहे.

कोरेगाव भीमा प्रकरणी अटकेत असलेले शहरी नक्षलवादी वरवरा राव यांना रुग्णालयात उपचारास अनुमती

शहरी नक्षलवादी यांची प्रकृती बिघडल्याने १५ दिवस उपचारांसाठी नानावटी रुग्णालयात भरती

सिंधुदुर्गात १३ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले, दोघांचा मृत्यू 

सिंधुदुर्गात कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ५ सहस्र ९० झाली आहे.