राज्यातील शाळा चालू करण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाला काळजी घेण्याच्या सूचना

पुणे – राज्यातील शाळांमध्ये २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग चालू होत आहेत त्या पार्श्‍वभूमीवर योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना केल्या असून त्यानुसार स्थानिक महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने व्यवस्था करावी अशा सूचना शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी दिल्या आहेत.

शाळांना सॅनिटायझर, थर्मल गन, ऑक्सिमीटर अशा आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात स्थानिक प्रशासनाने सहकार्य करावे, तसेच २२ नोव्हेंबरपर्यंत संबंधित शिक्षकांना शासकीय केंद्रात कोविड-१९ साठी (आर्.टी.पी.सी.आर्. टेस्टिंग) विनामूल्य वैद्यकीय तपासणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी, असे कृष्णा यांनी नमूद केले आहे.