देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्यसेवेवर अत्यंत अल्प व्यय ! – आरोग्य संसदीय समिती
आरोग्य सेवेविषयी उदासीन असलेले सरकार !
आरोग्य सेवेविषयी उदासीन असलेले सरकार !
८५ टक्के नागरिकांमधील प्रतिपिंडे कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे.
२३ नोव्हेंबरपासून शाळा चालू करणे बंधनकारक नाही.
आज शासकीय कर्मचार्यांना सहस्रो रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत वेतन मिळते. असे असतांना वैद्यकीय दाखले आणि शस्त्रक्रिया यांसाठी रुग्णांकडून पैसे घेतले जात असतील, तर ते सर्वथा लज्जास्पद आहे !
कोरोना रुग्णांसाठी उपचार घेतांना एका साधकाला प्रशासकीय कारभाराविषयी आलेले कटू अनुभव येथे देत आहोत.
मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने बृहन्मुंबई महापालिकेने ३१ डिसेंबरपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातील शाळाही ३१ डिसेंबरपर्यंत बंद रहातील, असा निर्णय घेण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.
जगभरातील विविध आजारांच्या साथींचा संसर्ग पुण्यात सातत्याने दिसत आहे. स्वाइन फ्लू पाठोपाठ आता ११ वर्षांनंतर कोरोना महामारीची साथ पुणे येथे मुंबईपेक्षा अधिक तीव्रतेने आहे. त्यामुळे पुण्यात साथरोग रुग्णालय होणे अत्यंत आवश्यक आहे.
‘भारतीय संस्कृतीने दिलेला औषधांचा, आहार-विहाराचा आणि धर्माचरणाचा अनमोल ठेवा कोरोनासारख्या संकटात संयमी भारतियांच्या कामी आला’, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. येणार्या काळात ‘कोरोनापेक्षा कितीही भयंकर विषाणू आले, तरी भक्तीचे शस्त्र त्याला सर्व औषधे उपलब्ध करून देईल’, ही श्रद्धाच भारतियांना यापुढेही तारून नेईल !
जिल्ह्यात २४ घंट्यांत कोरोनाचे नवीन ८ रुग्ण आढळले असून एकूण ४ सहस्र ८३५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात १४४ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार चालू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.
गेल्या २४ घंट्यांत जिल्ह्यात १२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ५ सहस्र ११५ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या ४ सहस्र ८०९ आहे.