देहलीमध्ये मास्क न वापरणार्‍यांना आता २ सहस्र रुपयांचा दंड होणार

प्रतीकात्मक छायाचित्र

नवी देहली – देहलीमध्ये गेल्या २४ घंट्यांमध्ये कोरोनामुळे १३१ जणांचा मृत्यू झाला, तर ७ सहस्र ४८६ नवे रुग्ण आढळले. त्यानंतर आता देहली सरकारने देहलीत मास्क न घालणार्‍यांना २ सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्याची घोषणा केली. यापूर्वी ५०० रुपयांचा दंड होता.