भोगावती नदीला दूषित पाणी, मृत माशांचा खच


कोल्हापूर –जिल्ह्यातील कुडित्रे भागातील भोगावती नदीला १७ नोव्हेंबर या दिवशी दूषित पाणी आल्याने दोनवडे, बालिंगा, पाडळी खुर्द येथे नदीपात्रात मासे मृत्यूमुखी पडू लागले आहेत. पाण्यालाही उग्र वास असल्याने दोनवडे, बालिंगा ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले आहे. तसेच दूषित पाणी आले कुठून ?, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. नदीला आलेले दूषित पाणी पुढे नागदेवाडी, हणमंतवाडी, शिंगणापूर, बालिंगा, शिंगणापूर पंप हाऊस येथून कोल्हापूरला जाणार आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होणार आहे.