सर्वोच्च न्यायालयाकडून तीनही कृषी कायद्यांना स्थगिती !

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने बनवलेल्या तीन कृषी कायद्यांना पुढील आदेश देईपर्यंत स्थगिती दिली आहे. कोंडी सोडवण्यासाठी शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यामध्ये चर्चा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

आनेवाडी (जिल्हा सातारा) येथील पथकर नाका आंदोलनाच्या गुन्ह्यातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह १७ जण निर्दोष मुक्त

या वेळी जिल्हाधिकार्‍यांच्या जमावबंदी आदेशाचे आंदोलकांकडून उल्लंघन झाले होते. यामुळे पोलिसांनी आमदार भोसले आणि समर्थकांवर गुन्हा नोंद केला होता.

आय.आय.टी. प्रकल्प रहित करण्यासाठी शेळ-मेळावली येथील आंदोलकांकडून शासनाला १० दिवसांची मुदत

शेळ-मेळावली येथील नियोजित आय.आय.टी. प्रकल्प रहित करण्यासाठी येथील आंदोलकांकडून शासनाला १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ट्वीट करणार्‍या वैमानिकाला ‘गोएअर’ने कामावरून काढले !

या ट्वीटवरून वाद झाल्याने मलिक यांनी ते डिलीट करत क्षमायाचनाही केली होती. ‘ट्वीटमधून व्यक्त करण्यात आलेली मते वैयक्तिक होती. त्यांच्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या गोएअरचा कोणताही संबंध नाही’, अशी क्षमा त्यांनी मागितली होती.

मेळावली येथील आय.आय.टी. प्रकल्पाच्या भूसर्वेक्षणाचे काम उद्या चालू रहाणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

मेळावली येथे आय.आय.टी. प्रकल्प उभारण्याविषयी गोवा शासन ठाम आहे. या प्रकल्पाला तेथील स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार येथील अंदाजे १७ ग्रामस्थ कुटुंबीय प्रकल्पासाठीच्या सरकारी भूमीवर लागवड करतात.

कर्नाल (हरियाणा) येथे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला शेतकर्‍यांचा प्रखर विरोध

येथील कैमला गावामध्ये भाजपकडून महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते आणि त्याला मुख्यमंत्री खट्टर उपस्थित रहाणार होते. त्या वेळी ही घटना घडली.

मध्यप्रदेशमध्ये दगडफेक करणार्‍यांवर कठोर कारवाई करणारा कायदा होणार

प्रस्तावित कायद्यामध्ये दगडफेक करणार्‍यांवर अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्यात येणार आहे. संपूर्ण वसुली संबंधित आरोपींकडून केली जाणार आहे. धार्मिक स्थळांवरून दगडफेक झाली, तर हे धार्मिक स्थळ सरकारकडून अधिग्रहित करण्यात येणार आहे.

शैलेंद्र वेलिंगकर यांच्यावरील अत्याचार, हा भाजपचा माझ्या विरोधातील सूडचक्राचा भाग ! – प्रा. सुभाष वेलिंगकर

या मारहाणीत शैलेंद्रचा ‘इअरड्रम’ फाटला असून डाव्या कानाने ऐकू येणे बंद झाले आहे. त्याला हेतूपुरस्सर सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात न तपासता, म्हापशाच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

शिर्डीतील साई संस्थानच्या वस्त्र संहितेविषयीच्या फलकाला काळे फासले !

धार्मिक स्थळांच्या ठिकाणी कोणता पोशाख परिधान करावा, याविषयी धर्मशास्त्रात नियम आहेत. त्याचे हिंदू पालन करू इच्छितात; मात्र त्याला विरोध करून भूमाता ब्रिगेड स्वतःचे घोडे पुढे दामटू पहात आहे. यातून त्यांची उद्दाम वृत्ती दिसून येते !

स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान शाळेच्या भूखंडावरील आरक्षण उठवण्याचा प्रस्ताव महासभेत फेटाळणार ! – युवराज बावडेकर

श्री. बावडेकर पुढे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या शाळेजवळील भूखंडावरील आरक्षण उठवण्यास भाजपचा विरोधच आहे. महासभेसमोर हा विषय आल्यास यावर सखोल चर्चा होऊन तो फेटाळण्यात येईल.