कर्नाल (हरियाणा) येथे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला शेतकर्‍यांचा प्रखर विरोध

पोलीस आणि शेतकरी यांच्यात झटापट !

शेतकर्‍यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर

चंडीगड – हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या राज्यातील कर्नाल येथील आयोजित कार्यक्रमला शेतकर्‍यांनी प्रखर विरोध केला. या वेळी शेतकर्‍यांनी केलेल्या आंदोलनामुळे पोलीस आणि शेतकरी यांच्यात झटापट झाली. पोलिसांनी शेतकर्‍यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. येथील कैमला गावामध्ये भाजपकडून महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते आणि त्याला मुख्यमंत्री खट्टर उपस्थित रहाणार होते. त्या वेळी ही घटना घडली.