पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या भित्तीपत्रकांवर काळी शाई फासून लिहिले ‘चोर ४२०’ !  

गेल्या ५ दिवसांपासून बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची हनुमंत कथा चालू आहे. त्या संदर्भात ठिकठिकाणी भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. यांतील काही भित्तीपत्रकांवर काळी शाई फासून ‘चोर ४२०’ असे लिहिण्यात आल्याचे समोर आले आहे.

सिंधुदुर्ग : ‘एनर्जी ड्रिंक्स’च्या नावाखाली नशा आणणारी शीतपेये बाजारपेठेत उपलब्ध

‘२५० मि.ली.च्या बाटलीत ७५ मि.ली. ग्रॅमहून अधिक ‘कॅफेन’ घेऊ नये’, अशी नोंदही बाटलीवर आहे. लहान मुले, गरोदर माता, स्तनपान करणार्‍या माता यांना धोकादायक असल्याची नोंदही त्यावर आहे.

(म्हणे) ‘द केरल स्टोरी’च्या दिग्दर्शकाचे डोळे काढणार्‍याला २१ लाख रुपये देऊ !’ – ‘हक-ए-हिंदुस्तान मोर्चा’ या धर्मांध संघटनेची घोषणा

बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल (संयुक्त) यांचे हिंदुद्वेषी सरकार असल्याने अशा संघटनेवर कोणतीही कारवाई होणार नाही, हे निश्‍चित !

(म्हणे) ‘भारतात मुसलमानांच्या विरोधात द्वेषाला प्रोत्साहन दिले जात आहे !’ – अमेरिकेतील पाकिस्तानी दूतावासातील अधिकार्‍याचे हिंदुद्वेषी विधान

भारतावर कुरघोडी करण्याची एकही संधी न सोडणार्‍या पाकला भारताने जशास तसे उत्तर दिले पाहिजे !

ऑस्ट्रेलियात खलिस्तानवादी संघटनेने आयोजित केलेला जनमत संग्रहाचा कार्यक्रम रहित !

ऑस्ट्रेलिया सरकारने हा कार्यक्रम आयोजित करणार्‍या खलिस्तानवाद्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !

देहली येथे पार पडले कुत्र्यांच्या आक्रमणांपासून उपाय शोधण्यासाठीचे चर्चासत्र !

असे चर्चासत्र का आयोजित करावे लागते ? सरकारला जनतेची समस्या कळत नाही का ?

देशभरात चित्रपट प्रदर्शित झाला असतांना बंगालमध्ये का नाही ? – सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

हिंदूंच्या देशांत हिंदूंवर होणारे अत्याचार न रोखता हे अत्याचार जगासमोर आणणार्‍या चित्रपटावरच बंदी घालणार्‍या बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि तमिळनाडू सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम् या पक्षांना हिंदूंनी राजकीय धडा शिकवणे आवश्यक !

पाकिस्तानमध्ये मुलीच्या विनयभंगाला विरोध करणार्‍या हिंदु पित्याचा जिहाद्यांनी केला शिरच्छेद !

पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये एका हिंदु पित्याने त्यांच्या मुलीचा विनयभंग करणार्‍या जिहाद्यांना विरोध केला. या रागातून जिहाद्यांनी त्यांचा शिरच्छेद केला. अलमाख भील असे मृत हिंदु व्यक्तीचे नाव आहे.

चीनकडून कैलास मानसरोवर यात्रेचे शुल्क दुप्पट !

हा चीनचा हिंदुद्वेष असून सरकारने तात्काळ याचा निषेध करून हे वाढीव शुल्क रहित करण्यासाठी चीनवर दबाव आणला पाहिजे !

‘द केरल स्टोरी’ला विरोध करणे चुकीचे ! – अभिनेत्री शबाना आझमी

नुकताच प्रदर्शित झालेला ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाला विरोध करणे चुकीचे आहे, असे मत अभिनेत्री शबाना आझमी यांनी ट्वीट करून व्यक्त केले.