लाकडी घाण्याचे आरोग्यदायी तेल !

शेकडो वर्षांपासून आपले पूर्वज लाकडी घाण्याचे तेल उपयोगात आणत असल्यानेे ते निरोगी आणि दीर्घायुषी होते. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या लाकडी घाण्याच्या तेलाचा उपयोग करून दीर्घायुष्यी जीवनाचा समतोल साधूया !

‘जिभे’चे चोचले !

मनाच्या आहारी जाऊन शरीर स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करणे, हा एक प्रकारे स्वैराचारच झाला. सोयीपेक्षा आवश्यकतेला प्राधान्य देणे, हे सूज्ञपणाचे लक्षण आहे. शरीर म्हणजे भगवंताने दिलेली देणगी असून त्याच्या पालनाचे दायित्व स्वतःचे आहे, हे कळले पाहिजे. ‘जिभे’पेक्षा शरिराला काय हवे ? याकडे कटाक्ष असला पाहिजे.

कागदोपत्री वृद्धाश्रम !

जेव्हा वृद्धाश्रमांना मान्यता देण्यात आली, तेव्हा याविषयीचे सर्व सोपस्कार पूर्ण करण्यात आले; मात्र हे सर्व कागदावरच राहिले. प्रत्यक्षात उपरोल्लेखित गावांत एकाही ठिकाणी वृद्धाश्रम अस्तित्वात आला नाही.

हिंदूंनो, सावधान ! इतिहास पालटला जात आहे !

हिंदवी स्वराज्यासाठी प्राणपणाने लढणार्‍या महाराष्ट्रातील हिंदु मावळ्यांचा इतिहास झाकोळून त्याला खोट्या धर्मांधतेची काजळी लावण्याचे धाडस या महाराष्ट्राच्या भूमीत केले जात आहे. हिंदूंनो, चला तर मग सत्य इतिहास समाजापर्यंत पोचवूया !

कर्जबुडव्यांचे राखणदार शोधा !

देशातील १२ राष्ट्रीयीकृत अधिकोषांनी गेल्या ८ वर्षांत थकबाकीदार कर्जदारांची ६.३२ लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेची कर्जे निर्लेखित (बुडीत) केली आहेत. यातील पावणेतीन लाख कोटींहून अधिक रकमेची कर्जे बड्या थकबाकीदारांची (१०० कोटी आणि त्यापेक्षा अधिक) आहेत.

नाक दाबून तोंड उघडणे !

रब्बी हंगाम ऐन तोंडाशी आलेला असतांना चाळीसगाव  (जळगाव) तालुक्यात ७ सहस्रांहून अधिक, तर सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड आणि पाटण तालुक्यांतील २ सहस्रांहून अधिक शेतकर्‍यांच्या शेतीपंपांची वीजजोडणी महावितरणने तोडली. शेतकर्‍याने मोठ्या कष्टाने पिकवलेले पीक हानी होण्याच्या स्थितीत आहे.

दळणवळण बंदीतील घटस्फोट !

जगभरात कोरोना महामारीच्या संकटामुळे गेल्या वर्षी काही मास दळणवळण बंदी होती. याचे परिणाम वेगवेगळ्या स्तरांवर झालेले दिसत आहेत. यामध्ये कौटुंबिक कलह आणि त्यातून घटस्फोट होणे, ही गंभीर समस्याही समोर आली आहे.

जलप्रदूषणाचे स्रोत आणि उपाययोजना !

जलप्रदूषण ही गंभीर समस्या गेल्या काही वर्षांपासून निर्माण झालेली आहे. जलस्रोतांची पडताळणी होतांना जलप्रदूषण करणारे स्रोत शोधून त्यांचा बंदोबस्त केला, तर ही समस्या मुळापासून सुटू शकते.

उत्तम स्वास्थ्यासाठी !

उत्तम स्वास्थ्यासाठी शरिराला थोडी शारीरिक कष्ट करण्याची सवय लावल्यास छोट्या शारीरिक कुरबुरींवर सहजपणे मात करता येईल, तसेच दिवसभर उत्साही वाटेल. त्यामुळे उत्साही रहाण्याची सुवर्णसंधी दवडायला नको !

अतिरेकी प्रेम !

एकमेकांवर प्रेम व्यक्त करणे, हे काही चुकीचे नाही; मात्र ते खासगीत करण्याऐवजी सार्वजनिक ठिकाणी त्याचे अशा प्रकारे प्रदर्शन मांडणे, हे चुकीचे आहे. यातून नेमका कोणता संदेश समाजाला जाणार ? ही एक प्रकारची विकृतीच समाजात दिसते.