आंबेडकरनगर (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल भागातून जाणार्‍या हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीवर दगडफेक आणि धारदार शस्त्रांनी आक्रमण

२ हिंदू गंभीररित्या घायाळ

  • उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर धर्मांधांकडून आक्रमण होणे हिंदूंना अपेक्षित नाही. सरकारने येथे धर्मांधांवर वचक निर्माण करण्याची आवश्यकता आहे. या आक्रमणाला उत्तरदायी असणार्‍यांना कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने आता प्रयत्न करावेत !
  • मुसलमानबहुल भागात हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर आक्रमण का होते, याचे उत्तर पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी कधीही देणार नाहीत आणि अशा आक्रमणकर्त्यांना सर्वधर्मसमभावाचे डोसही पाजणार नाहीत, हे लक्षात घ्या !

आंबेडकरनगर (उत्तरप्रदेश) – येथे १५ नोव्हेंबर या दिवशी मुसलमानबहुल पंहितीपूर बाजारामध्ये श्री लक्ष्मी आणि श्री गणेश यांच्या मूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीवर मशिदीसमोर डिजे वाजल्याचे सांगत धर्मांधांनी दगडफेक केली. घरांच्या छतावरून ही दगडफेक करण्यात आली. तसेच लाठी, काठी आणि धारदार शस्त्रांनी हिंदूंवर आक्रमण केले. यात २ जण गंभीररित्या घायाळ झाले, तर १० ते १२ जण किरकोळ घायाळ झाले. पोलिसांनी जुबेर, शेरू, शहजादे, शादान खान, फहीम, शब्बर, जीशान खान यांच्या समवेत आणखी ८ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करून एकूण ११ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी येथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला आहे.