पुणे येथे ३ अल्‍पवयीन मुलांनी केली तरुणाची हत्‍या !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत झालेल्‍या वादाचा मनात राग धरून श्रीपत बनकर या तरुणाची हत्‍या करण्‍यात आली. या प्रकरणी ३ अल्‍पवयीन मुलांना कह्यात घेण्‍यात आले आहे. ही घटना ३ डिसेंबरच्‍या मध्‍यरात्री वडगाव परिसरातील चरवड वस्‍ती येथे घडली. सिंहगड रस्‍ता पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे. श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्‍ये गणपति मंडळांच्‍या मिरवणुका रांगेत लावण्‍यावरून मृत्‍यू झालेला तरुण आणि आरोपी यांच्‍यात वाद झाला होता. घटनादिनी श्रीपत याला थांबवून आरोपींनी ‘खुन्‍नस (रागाने पहाणे) देऊन का बघतोस ?’ असे म्‍हणत हातातील सत्तूर आणि दगड यांनी मारहाण केली.

वडिलांना ‘टकल्‍या’ म्‍हटल्‍याच्‍या रागातून हत्‍या

राजू लोहार यांनी अल्‍पवयीन मित्राच्‍या वडिलांना ‘टकल्‍या’ म्‍हटले. याचा राग मनात धरून १६ वर्षीय अल्‍पवयीन मुलाने राजू लोहार यांची हत्‍या केली. ही घटना वाघोली परिसरात ४ डिसेंबर या दिवशी घडली. आरोपी आणि मृत्‍यू झालेला युवक हे दोघे मित्र असून ते मद्य पित होते. त्‍या वेळी किरकोळ वाद झाला. तेव्‍हा राजू लोहार यांनी अल्‍पवयीन मुलाच्‍या वडिलांना ‘टकल्‍या’ म्‍हटल्‍याचा आरोपीला राग आला.

संपादकीय भूमिका :

  • क्षुल्लक कारणांवरून अल्‍पवयीन मुलांनी हत्‍या करणे म्‍हणजे राज्‍य विनाशाच्‍या गर्तेत चालल्‍याचे लक्षण !
  • मुलांना धर्मशिक्षण देऊन साधना शिकवली पाहिजे ! साधना केल्‍याने मनुष्‍याच्‍या वृत्तीमध्‍ये पालट होतो, हे त्‍यांच्‍या मनावर बिंबवले पाहिजे !