मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती

मुंबई – माघी गणेशोत्सवातील गणेशमूर्तीं ‘पीओपी’च्या असल्याने त्यांच्या विसर्जनास मुंबई महापालिकेने बंदी घातली होती. त्यामुळे अद्यापही त्या मूर्ती तशाच होत्या. त्यांच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती मुंबई महापालिकेकडून करण्यात आली आहे; परंतु ‘कृत्रिम तलावांत मूर्तींची उंची मोठी असल्याने विसर्जन होऊ शकणार नाही’, असे मंडळांचे म्हणणे आहे.

भोंगे आणि गणेशमूर्ती यांसाठी अधिकार्‍यांकडून वेगळी भूमिका ! – आशिष शेलार, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री

‘भोंग्यासाठी एक भूमिका आहे. महापालिकेच्या अधिकार्‍यांकडून हिंदुविरोधी भूमिका घेतली जात आहे. हिंदूंना दुटप्पी न्याय दिला जात आहे’, असे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी या प्रकरणी म्हटले आहे. त्यामुळे सरकार या प्रकरणी न्यायालयात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.