माफीचा साक्षीदार बनण्याची वाझे यांची सिद्धता !

अनिल देशमुख, परमबीर सिंह आणि सचिन वाझे

मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माफीचा साक्षीदार बनण्याची सिद्धता दर्शवली आहे. याविषयी त्यांनी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) पत्र पाठवले आहे.

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) पाठविलेले पत्र – 

(पत्र वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

या पत्रात वाझे यांनी म्हटले आहे की, ‘या संदर्भातील संपूर्ण वस्तूस्थिती सक्षम न्यायदंडाधिकार्‍यांसमोर सत्य आणि ऐच्छिकपणे प्रकट करण्यास सिद्ध आहे. मला माफी देण्यात यावी.’

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) एप्रिल २०२१ मध्ये परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर देशमुख यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता. त्या आधारावर ११ मे २०२१ या दिवशी ‘ईडी’ने देशमुख यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा नोंद केला. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी बारमालकांची बैठक आयोजित करून डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ मध्ये ४ कोटी ७० लाख रुपये जमा केल्याचा आरोप आहे.