कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याने केंद्र सरकारचा निर्णय
मुंबई – कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याने केंद्रशासनाने आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक नियमावलीत निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. १४ फेब्रुवारीपासून हा निर्णय लागू होणार आहे. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर राज्यात दळणवळण बंदी लागू करण्यात आली होती. परदेशातील विमान वाहतुकीवरही बंदी घालण्यात आली होती. आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतर निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय केंद्रशासनाने घेतला आहे. यामध्ये जोखमीच्या देशांतून येणार्यांना ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी करण्याची आवश्यकता असणार नाही. ७ दिवसांचा गृहविलगीकरणाचा नियम असणार नाही; मात्र १४ दिवस स्वतःचे निरीक्षण करावे लागणार आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार भारतात प्रवास करणार्या प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी ‘स्वयं घोषणा’ अर्ज भरून द्यावा लागणार आहे.