
मुंबई – भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक शिवाजी पार्क येथे व्हावे, ही आमची इच्छा नाही. त्यामुळे राजकारण्यांनी लता मंगेशकर यांच्या स्मारकाचा वाद बंद करावा, असे आवाहन लता मंगेशकर यांचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी केले आहे.
पंडित हृदयनाथ मंगेशकर पुढे म्हणाले, ‘‘लता मंगेशकर यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली, ती अवकाशाएवढी मोठी आहे. त्या अवकाशाच्या पोकळीत अनेक गंगा ओतल्या, तरी ती पोकळी भरून निघणार नाही. लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून वाद चालू आहे. आम्ही मंगेशकर कुटुंबियांनी या वादात भाग घेण्याचे काहीही कारण नाही. महाराष्ट्र शासनाने लता मंगेशकर संगीत विद्यालय स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्वसिद्धता त्यांनी केली आहे. लता मंगेशकर यांचे संगीत स्मारक होणार आहे, यापेक्षा अन्य कुठलेही मोठे स्मारक होऊ शकत नाही.’’
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)