-
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे मत
-
लक्ष्य करणार्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याच्या सूचना
मुंबई – उपलब्ध कागदपत्रांनुसार अमली पदार्थविरोधी पथकाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे हिंदूच असून त्यांची जात अनुसूचित जातीच्या वर्गात मोडत असल्याचे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने घोषित केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक चांगलेच तोंडघशी पडले आहेत. विशेष म्हणजे समीर वानखेडे यांना लक्ष्य करणार्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. तसेच चौकशीच्या नावाखाली समीर वानखेडे यांना त्रास न देण्याचे पोलिसांना निर्देश दिले आहेत.
चित्रपट अभिनेते शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन याच्या अटकेनंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर ‘त्यांचे जात प्रमाणपत्र खोटे आहे’, असा आरोप केला होता. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने दिलेल्या या निर्णयामुळे ‘आता नवाब मलिक यांच्यावर गुन्हा नोंद होणार का ?’, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच महाराष्ट्रात जात पडताळणी समितीने याविषयी एक मासात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.