राणा यांवरील राजद्रोहाचा गुन्हा अभ्यास करूनच नोंदवला ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

पोलीस अभ्यास करूनच गुन्हा नोंदवतात. मुंबई सत्र न्यायालयाने जामीन देतांना त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा नोंदवणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. पत्रकारांनी विचारल्यावर गृहमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

पावणे (नवी मुंबई) औद्योगिक वसाहतीतील ९ आस्थापनांना भीषण आग

आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. ५ अग्नीशमन बंबांद्वारे ही आग विझवण्याचा प्रयत्न केला जात होता.

राज्यातील ३५ लाख ९२ सहस्र ९२१ विद्यार्थ्यांना मिळणार विनामूल्य गणवेश !

शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती-जमातीतील मुले आणि दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले यांच्यासाठी विनामूल्य गणवेशाची योजना लागू आहे.

भोंग्यांविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन न करणाऱ्या सर्व राज्य सरकारांवर कारवाई करा ! – ईश्वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

अजान देणे, हा धार्मिक अधिकार असू शकतो; पण त्यासाठी मशिदींवर भोंगे लावणे, हा धार्मिक अधिकार मुळीच असू शकत नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या निवडणुकीच्या निर्णयाविषयी राज्य सरकारमध्ये संभ्रम !

सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या कायद्याविषयी भाष्य केलेले नाही. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय नेमका काय आहे ? याविषयी राज्य सरकारमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

वांद्रे येथील शासकीय भूखंड कवडीमोल किंमतीने विकून १ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा !

वांद्रे (पश्चिम) येथील बँडस्टँड या उच्चभ्रू वस्तीत ‘ताज’ उपाहारगृहाच्या शेजारी समुद्रकिनारी मोक्याच्या ठिकाणी असणारा १ एकर ५ गुंठे हा शासकीय मालकीचा भूखंड ‘रूस्तमजी ब्लिल्डर’ला कवडीमोल किमतीत विकण्यात आला आहे….

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी शरद पवार यांची जे.एन्. पटेल आयोगाकडे साक्ष नोंद !

कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या प्रकरणी पू. भिडेगुरुजी यांचे शरद पवार यांनी नाव घेतले; मात्र नंतर घूमजाव करून त्यांचा सहभाग नसल्याचे सांगितले. शरद पवार यांनी कोणत्या आधारावर त्यांचे नाव घेतले ?

मुंबईतील २६ मशिदींत पहाटेची अजान भोंग्याविना होणार !

ज्या मशिदींवर भोंगा लावण्यात येईल, त्या मशिदीच्या जवळील मंदिरांवर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

राणा दांपत्याला जामीन संमत !

काही दिवसांपूर्वी राणा दांपत्याने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याची घोषणा केली होती. त्यासाठी ते दोघे अमरावती येथून मुंबईत आले होते.

मुंबईत १ मासात १ सहस्र १४४ मशिदींकडून भोंग्यांसाठी अर्ज !

एप्रिल २०२२ मध्ये मुंबईतील १ सहस्र १४४ मशिदींकडून भोंग्यांसाठी पोलिसांकडे अर्ज करण्यात आला. त्यांतील ८०३ मशिदींना भोंगा लावण्यासाठी अनुमती देण्यात आली. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आश्वासन या मशिदींकडून देण्यात आले आहे.