मध्य रेल्वेच्या फलाट तिकीटदरात पाचपट वाढ !

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि पनवेल या महत्त्वाच्या स्थानकांवरील फलाटाचा तिकीटदर १० रुपयांवरून ५० रुपये करण्यात आला आहे. ९ ते २३ मे या कालावधीसाठी तिकिटाचे दर वाढवण्यात आले आहेत.

राज ठाकरे यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यासाठी न्यायालयात याचिका !

मशिदींपुढे हनुमान चालिसा लावण्याचे आवाहन, तसेच मशिदींवरील भोंगे उतरवण्याविषयी चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप करत ‘इंडिया अगेंस्ट करप्शन’ या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी ही याचिका केली आहे.

माहीम दर्ग्याच्या विश्‍वस्तांसह मुंबईतील २९ ठिकाणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या धाडी !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित असल्याच्या संशयावरून माहीम दर्ग्याच्या विश्‍वस्तांसह मुंबईतील २९ ठिकाणी धाडी टाकल्या. या प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली आहे.

आदित्य ठाकरे १० जून या दिवशी अयोधेला जाणार ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

पर्यावरणमंत्री आणि शिवसेनेच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे १० जून या दिवशी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्यासमवेत शिवसेनेचे खासदारही असतील, अशी माहिती संजय राऊत यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.

मुंबईतील २ मशिदींच्या व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हे नोंद !

सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ध्वनीक्षेपक लावल्यास त्यासाठीही शासनाने आवाजाची मर्यादा ठरवून दिली आहे; मात्र यांचे उल्लंघन करणार्‍यांवर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे.

मुंबईकरांना समुद्राच्या पाण्यापासून २०० दशलक्ष लिटर गोडे पाणी मिळणार !

मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी आता खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून गोडे पाणी मिळवण्यात येणार आहे. या नि:क्षारीकरण प्रकल्पासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

बहुसदस्यीय प्रभाग रचनेच्या निर्णयाच्या विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली !

राज्य सरकारने मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्या निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई येथील पावणे एम्.आय.डी.सी.मध्ये लागलेल्या भीषण आगीत ३ जणांचा मृत्यू !

येथील पावणे एम्आयडीसीमध्ये ६ मे या दिवशी रासायनिक आस्थापनाला लागलेल्या भीषण आगीत ६ आस्थापने जळून खाक झाली. या आगीत ३ जणांचा होरपळून मृत्यू झाला.

अजान देण्यासाठी भोंग्याची आवश्यकता नाही ! – अब्दुल कादिर मुकादम, इस्लाम अभ्यासक

मशिदीवरील भोंगे ७० च्या दशकानंतर चालू झाले. इस्लामचा जन्म झाला, तेव्हापासून ध्वनीक्षेपकावर कधीच अजान दिली गेली नव्हती. त्यामुळे अजान देण्यासाठी भोंग्याची आवश्यकता नाही.

राणा यांवरील राजद्रोहाचा गुन्हा अभ्यास करूनच नोंदवला ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

पोलीस अभ्यास करूनच गुन्हा नोंदवतात. मुंबई सत्र न्यायालयाने जामीन देतांना त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा नोंदवणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. पत्रकारांनी विचारल्यावर गृहमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली.