कुणीही कोणत्याही धार्मिक उपासनागृहावर बलपूर्वक अधिकार जमवणे क्रूर पाप आहे. मोगल काळात धार्मिक धर्मांधतेमुळे त्या शासकांनी हिंदूंची अनेक धार्मिक स्थळे कह्यात घेतली, जी त्यांची उपासनेची पवित्र स्थाने होती. त्यातील अनेक स्थळे लूटमार करून भ्रष्ट करण्यात आली आणि अनेकांना मशिदीचे स्वरूप देण्यात आले. जरी मंदिर आणि मशीद हे दोन्ही ईश्वराच्या उपासनेची पवित्र स्थाने आहेत आणि दोहोंमध्ये कोणताही भेद नाही, तरीही हिंदु अन् मुसलमान दोघांच्याही उपासना परंपरा भिन्न आहेत.
धार्मिक दृष्टीकोनातून हिंदू कधीच सहन करणार नाही की, ज्या मंदिरामध्ये तो नियमितपणे राम, कृष्ण, शिव, विष्णु आणि देवता यांची उपासना करत आला आहे, त्याला कुणी तोडून मशीद बनवावी. त्याचप्रमाणे एक मुसलमान कधीही सहन करू शकत नाही की, ज्या मशिदीमध्ये तो नियमित उपासना करत आला आहे, तेथे हिंदूंकडून अडथळा निर्माण व्हावा. जेथेही अशा घटना घडल्या आहेत, वास्तविक त्या गुलामीचे चिन्हे आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी अशा प्रकारचे वाद आहेत, त्याविषयी हिंदु आणि मुसलमान या दोघांनीही परत एकदा ठरवावे. मुसलमानांच्या कह्यात असलेली हिंदूंची स्थळे त्यांनी आनंदाने हिंदूंना परत करावीत, त्याचप्रमाणे हिंदूंच्या कह्यात असलेले मुसलमानांचे उपासना स्थळ हिंदूंनी त्यांना उदारतेने परत द्यावे. त्यामुळे आपसातील एकता वाढेल, जी भारतासारख्या धर्मप्रधान देशासाठी वरदान सिद्ध होईल.
(साभार : मासिक ‘सेवा समर्पण’, वर्ष ७ अंक २ आणि मासिक ‘नवजीवन’च्या २७.७.१९३७ च्या अंकामध्ये श्रीराम गोपाल ‘शरद’ यांच्या पत्राला उत्तर देतांना)
संपादकीय भुमिकायाविषयी काँग्रेसवाले, पुरो(अधो)गामीवाले, निधर्मीवादी सर्वधर्मसमभाववाले आणि लांगूलचालन करणारे राजकीय पक्षांचे नेते यांचे काय म्हणणे आहे ? ते गांधीजींच्या या विचारांचे अनुसरण करतील का ? गांधीजींचे हे विचार वाचून देशभरातील जी मंदिरे परकीय आक्रमकांनी पाडून मशिदी उभारल्या, त्या परत देण्याविषयी सांगण्याचे धाडस काँग्रेसवाले अन् संबंधित करतील का ? |