भारतात असहिष्णुता वाढत असल्याचे सांगणार्या अमेरिकेने तेथील समाजात गांधीविरोध का वाढत आहे, याची माहिती प्रथम जगाला द्यावी !
न्यूयॉर्क (अमेरिका) – येथील मॅनहॅटन भागातील मोहनदास गांधी यांच्या कांस्य पुतळ्याची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. या घटनेवर भारतीय वाणिज्य दुतावासाने अप्रसन्नता व्यक्त करत घटनेचा निषेध केला. अमेरिकेत राहणार्या भारतियांनीही या घटनेवर अप्रसन्नता व्यक्त केली आहे. ‘संबंधित प्रकरणाची तक्रार अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडे करण्यात आली आहे. या घृणास्पद कृत्यासाठी उत्तरदायी असलेल्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश अधिकार्यांना देण्यात आले आहेत’, अशी माहिती भारतीय वाणिज्य दुतावासाने दिली. २ ऑक्टोबर १९८६ म्हणजे गांधी जयंतीच्या दिवशी या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. गेल्या वर्षीही काही अज्ञातांनी अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये अशाच प्रकारे गांधींच्या पुतळ्याची विटंबना केली होती.