व्यावसायिक वाहनांचा कर माफ करूनही त्यावरील दंडाच्या रकमेची मागणी

कर माफ झाला असेल, तर दंडाची वसुली कशासाठी ?

हसनपूर (कर्नाटक) येथील प्राचीन मंदिरातील श्री महाकालीदेवीच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड

हे मंदिर वर्ष १११३ मध्ये बांधण्यात आले आहे. ही घटना २० नोव्हेंबर या दिवशी उघड झाली, जेव्हा भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले होते. कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !

‘एन् ९५’ मास्क वापरण्यास अयोग्य असल्याचे ५ मासांनंतर आरोग्य खात्याच्या लक्षात येणे दुर्दैवी !

‘गोव्यात ‘एन् ९५’ मास्क वापरण्यास अनुमती देण्यात येणार नाही’, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘यासंबंधीचा आदेश देण्यात आला आहे.

कोरोना महामारीच्या काळात प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे कोरोना वाढीला निमंत्रण !

कोरोना रुग्णांसाठी उपचार घेतांना एका साधकाला प्रशासकीय कारभाराविषयी आलेले कटू अनुभव येथे देत आहोत.

वृद्ध प्रवाशांसाठी उपाययोजना न करणारे भारतातील असंवेदनशील परिवहन खाते !

‘भारतातील परिवहन खात्याच्या प्रवासी बसची रचना आपल्या सर्वांना ठाऊक आहे. बसमध्ये चढण्यासाठी ज्या पायर्‍या असतात, त्यांची उंची भूमीपासून अधिक असते. त्यामुळे वृद्ध व्यक्ती बसमध्ये चढ-उतार करतांना होण्यार्‍या अपघातांचे प्रमाणही अधिक असते.

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर वास्को पोलिसांनी उत्तर भारतियांना छठ पूजा करण्यापासून रोखले

बार चालू, रेस्टॉरंट चालू, कॅसिनो चालू. मग हिंदूंचे सण-उत्सव बंद का ? भाविक हिंदू कोरोनाची मार्गदर्शक तत्त्वे पाळत नाहीत आणि दारूडे पाळतात, असे प्रशासनाला वाटते का ?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ८ सहस्र विद्यार्थ्यांच्या निकालाची पुनर्तपासणी !

निकालामध्ये चुका का राहिल्या आहेत, हे विद्यापिठाने सांगायला हवे. यामध्ये दोषी असणार्‍यांना कठोर शिक्षा व्हायला हवी. काही केले तरी यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या मनस्तापाची हानी कधीही भरून निघणार नाही.

तीन दिवसांत वीजदेयक सवलतीचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात आंदोलन करणार ! – अतुल भातखळकर, भाजप

महाविकास आघाडी सरकारने येत्या तीन दिवसांत वीजदेयकांच्या सवलतीचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करू, अशी चेतावणी भाजपचे मुंबई प्रभारी आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिली आहे.

डिचोली परिसरात नरकासुर प्रतिमांच्या सांगाड्यांमुळे वाहतुकीला अडथळा

खरेतर रस्त्यावर प्रतिमा जाळण्यावरच बंदी घालून ती कृती रोखायला हवी होती. प्रशासनात ते करण्याचे धाडस नाही, तर निदान दुसर्‍या दिवशी रस्ते तरी स्वच्छ करायचे होते ! नरकासुरवृत्ती जोपासणारे प्रशासन काय कामाचे ?

प्रशासनाच्या विरोधात साईप्रसाद कल्याणकर यांचे लाक्षणिक उपोषण

तालुक्यातील बांदा-सटमटवाडी येथील सीमा तपासणी नाक्याच्या ३२ एकरातील बांधकामासाठी बिनशेतीची अनुमती घेतली नसतांना ग्रामपंचायत, तलाठी, तहसीलदार, नगर रचनाकार सिंधुदुर्ग यांच्याकडून हे अवैध बांधकाम होत असतांना कानाडोळा केला जात आहे.