प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !
भ्रष्टाचारी आरोग्य प्रशासन !
‘नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील महापालिकेच्या कोरोनाच्या पडताळणी केंद्रात कोरोनाची पडताळणी न केलेल्यांच्या कुटुंबियांचे कोरोनाचे अहवाल देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. (पालिकेच्या आरोग्य प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक) या प्रकरणी महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असे वृत्त ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने दिले. अधिक कहर म्हणजे काही वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीचाही कोरोनाचा पडताळणी अहवाल देण्याचा प्रकार घडला आहे.’
जे १४ वर्षे वयाच्या मुलीला कळले, ते सरकारला का कळत नाही ?
‘संभल (उत्तरप्रदेश) येथे इयत्ता १० वीमध्ये शिकणार्या एका मुलीने १४.८.२०२० या स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. वाढते प्रदूषण, भ्रष्टाचार आणि समाजाला त्रास देणारे काही लोक यांना कंटाळून या मुलीने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. आत्महत्येपूर्वी या मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १८ पानांचे पत्र लिहिले होते. चौकशीच्या वेळी पोलिसांना हे पत्र सापडले. दिवाळीतील फटाके, होळीतील रासायनिक रंग यांना विरोध असल्याचा पत्रात उल्लेख करण्यात आला आहे.’
झोपलेले सरकार !
‘पुणे जिल्ह्यातील मुळशी धरणाविषयी टाटा समूह आणि राज्य सरकार यांच्यातील करार संपुष्टात येऊन १० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे; पण धरणाचा ताबा आजही टाटा समूहाकडे आहे.’
जे एका मुसलमान अधिकार्याला कळते, ते एकाही हिंदु अधिकार्याला कसे कळत नाही ?
‘अयोध्येत श्रीरामजन्मस्थानाचा पाया पुरातत्व विभागाच्या पद्धतीनुसार खोदला गेला पाहिजे. याद्वारे सापडणार्या अवशेषांना भावी पिढीसमोर ठेवता येईल. यामुळे त्यांना इतिहासाची माहिती आणि स्थापत्यशास्त्र समजण्याची संधी मिळेल. येथे पुरातत्वदृष्ट्या महत्त्वाची सामग्री समोर येण्याची शक्यता आहे. पाया खोदतांना१२ वे शतक आणि त्यापूर्वीच्या मंदिराप्रमाणे श्रीरामजन्मभूमीतून सापडलेले अवशेष नव्या श्रीराममंदिराच्या खाली संग्रहालय बनवून त्यात ठेवले जावेत, तरच संपूर्ण इतिहासासाठी हे मोठे यश ठरेल, असे पुरातत्व विभागाचे माजी अधिकारी के.के. महंमद यांनी म्हटले आहे.’
हे भारत सरकारला का कळत नाही ?
‘नॉर्वेच्या पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांनी कट्टरपंथी गटांशी संबंध असलेल्या मुसलमानांना नॉर्वेतून हद्दपार करण्याचा कार्यक्रम जानेवारी २०२० पासून हाती घेतला आहे. यामुळे नॉर्वेतील हिंसक गुन्हेगारी ३१ टक्क्यांपेक्षा न्यून झाली आहे. दुसरीकडे तथाकथित उदारमतवादी या घटनेला धर्मांधतेचे नाव देऊन निषेध करत आहेत. ओस्लो येथील सामाजिक कार्यकर्ते अॅड्रियन स्टॅव्हिग म्हणाले की, जगातील सर्वांत मोठे गुंड, मारेकरी आणि बलात्कार करणार्यांची टोळी असलेले कट्टरतावादी मुसलमान ‘आमचा धर्म शांतीचा आहे’, असा दावा करत आहेत.’
हे भारत सरकारला लज्जास्पद ! आत्महत्येच्या आधीच उपाय का करत नाही ? असे सैनिक युद्धात कसे लढतील ?
‘काश्मीरमध्ये गेल्या ८ मासांत १८ सैनिकांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सैन्य, तसेच निमलष्करी दल यांच्या सूत्रांनी ही माहिती दिली. वर्ष २०१९ मध्ये काश्मीरमध्ये १९ सैनिकांनी आत्महत्या केली होती. वर्ष २०२० मध्ये या आत्महत्यांमागे कोरोनाचे संकट हे एक कारण असल्याचे सांगितले जात आहे. अनंतनाग आणि श्रीनगर येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अनुक्रमे उपनिरीक्षक अन् साहाय्यक निरीक्षक या पदावरील व्यक्तींनी आत्महत्येपूर्वी कोरोनाच्या भीतीमुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते.’