
तुळजापूर, ५ डिसेंबर (वार्ता.) – धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने ‘कुष्ठरोग आणि क्षयरोग रुग्ण अभियान-२०२०’ या आशयाचा उर्दू आणि मराठी भाषेतील फलक तुळजापूर येथील तहसील कार्यालयातील आवारात लावण्यात आला होता. या फलकावरील उर्दू भाषेतील लिखाणावर ‘हिंदु राष्ट्र सेने’च्या वतीने आक्षेप घेण्यात आला. हा फलक तात्काळ हटवण्यासाठी पू. महंत मावजीनाथजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने तुळजापूर येथील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनामुळे तहसील कार्यालयातील उर्दू भाषेतील फलक तातडीने हटवण्यात आला.
पू. मावजीनाथ महाराज यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनावर हिंदु राष्ट्र सेनेचे धाराशिव जिल्हा संघटक सर्वश्री परीक्षित साळुंके, संजय सोनवणे, विनायक माळी, दिनेश धनके, योगी खुंटाफळे, बालाजी पांचाळ, राजेंद्र सुरवसे आदी मान्यवरांनी स्वाक्षर्या केल्या. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले होते की,
१. जे नागरिक या राज्यात तथा देशात रहातात त्यांना राज्य आणि राष्ट्र भाषा स्वीकारणे बंधनकारक आहे. देशातील राज्यांची रचना ही भाषावार झालेली आहे. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य असतांना उर्दू भाषेत फलक प्रसिद्ध करणे म्हणजे पुन्हा एकदा मोघल आणि निजाम यांची सत्ता स्थापन करण्याचे षड्यंत्र तर नाही ना ?
२. उर्दू ही राज्य किंवा राष्ट्र भाषा नाही. तरीही असे फलक छापून ते तहसील कार्यालयात लावण्यामागील सरकारचा हेतू काय आहे, हे जनतेला समजले पाहिजे. याविषयी सरकारने लेखी स्वरूपात आपला खुलासा करावा.
३. तसेच संबंधित फलकावरील उर्दू भाषा तात्काळ हटवून राज्य आणि राष्ट्र भाषेमध्ये फलकप्रसिद्धी करावी, अन्यथा वैध मार्गाने आंदोलन करण्यात येईल.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)
हिंगणगाव-खामगाव टेक (पुणे) येथील २४ कोटी रुपयांचा पूल पहिल्याच पावसात कोसळला !
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस !
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !