करमळी, वाळपई येथील नागरिकांचा खंडित वीजपुरवठ्याच्या विरोधात वीज खात्यावर मोर्चा

प्रातिनिधिक छायाचित्र

वाळपई, ४ डिसेंबर (वार्ता.) – सत्तरी तालुक्यातील करमळी या गावात गेली ३५ वर्षे खंडित वीजपुरवठा होत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावात पथदीपांसाठी खांब उभारण्यात आलेले आहेत; मात्र गावात पथदीप नाहीत. वीज खात्याने गावात वीजपुरवठा सुरळीत करावा, या मागणीवरून करमळी या गावातील नागरिकांनी वीज खात्याच्या वाळपई कार्यालयातील साहाय्यक अभियंत्यांच्या कार्यालयावर मोर्चा नेला.