ऑगस्ट २०२१ मधील सर्वेक्षणाचा निष्कर्ष !
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही कुपोषणाची समस्या तीव्र असणे हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक
मुंबई, २५ डिसेंबर (वार्ता.) – शासनाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये मुंबईत ऑगस्ट २०२१ मध्ये ४ सहस्र १९४ तीव्र कुपोषित बालके आढळली आहेत. यामध्ये धारावी, मालवणी, मानखुर्द आणि गोवंडी या भागांत कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. २३ डिसेंबर या दिवशी काँग्रेसचे आमदार भाई जगताप, तसेच अन्य काही आमदार यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर अधिवक्त्या यशोमती ठाकूर यांनी वरील लिखित उत्तर दिले.