कोल्हापूर-सांगली एस्.टी. प्रवासासाठी आता द्यावे लागणार ८१ रुपये !
राज्य परिवहन महामंडळाने एस्.टी. बसच्या तिकिटात १४.९७ टक्के वाढ केली असून आता प्रवाशांना वाढीव दरानुसार तिकीट द्यावे लागणार आहे. कोल्हापूर-सांगली या प्रवासासाठी जिथे प्रवाशांना पूर्वी ७० रुपये द्यावे लागत होते, आता ८१ रुपये द्यावे लागणार आहेत.