राज्य परिवहन मंडळातील कर्मचार्यांना भविष्यनिर्वाह निधी दिला नसल्याची सरकारची स्वकृती !

मुंबई, १२ मार्च (वार्ता.) – राज्य परिवहन मंडळातील कर्मचार्यांचा भविष्य निर्वाह निधी, उपदान निधीचे २ सहस्र २१४ कोटी ४७ लाख रुपये देणे शेष आहे; परंतु कोणत्याही कर्मचार्याची हानी होऊ देणार नाही. त्यांचा भविष्यनिर्वाह निधी लवकरच देण्यात येईल, असे आश्वासन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेमध्ये दिले. सदस्य डॉ. परिणय फुके यांनी याविषयी तारांकित प्रश्न मांडला होता.
मंत्री सरदेसाई पुढे म्हणाले, ‘‘राज्य परिवहन मंडळाला प्रतिमाह ६४ कोटी रुपयांची हानी होते. नागरिकांना दिलेल्या अनेक सवलतींमुळे एस्.टी.चा तोटा वाढत आहे. मिळालेल्या उत्पन्नातून कर्मचार्यांचे वेतन दिले जाते. चालू अंदाजपत्रकांमध्ये राज्य परिवहन मंडळाला भरघोस आर्थिक प्रावधान करण्यात आले आहे. कर्मचार्यांचा भविष्यनिर्वाह निधी आणि उपदान निधी लवकरच खात्यावर जमा करू.
विरोधकांचा दबाव
विरोधक हे राजकीय द्वेषातून एखाद्याला कारवाई करण्यासाठी दबाव निर्माण करत आहे; परंतु कुणावर तरी कारवाई करणे उचित होणार नाही.
विरोधकांचा सभात्याग
दोषी अधिकार्यांवर, विश्वस्तांवर कारवाई करण्याचे सत्ताधारी टाळत आहेत. त्याचा निषेध व्यक्त करत विरोधकांनी काही वेळ सभात्याग केला.
संपादकीय भूमिकाफौजदारी गुन्हा नोंद करणार का ? कर्मचार्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम न भरणारे अधिकारी आणि राज्य परिवहन मंडळाचे प्रमुख यांवर कारवाई करणार का ? |