मणीपूरच्या प्रकरणावरून संसदेचे कामकाज काही वेळासाठी स्थगित !

सरकार चर्चेस सिद्ध असतांनाही विरोधी पक्षांकडून गदारोळ ! यावरून विरोधी पक्षांना मणीपूरच्या घटनेविषयी सुख-दुःख नाही, तर त्यांना यावरून  राजकारण करून सरकारला जाणीवपूर्वक वेठीस धरायचे आहेत, असेच दिसून येते !

लोकसभा आणि विधानसभा यांच्या एकत्रित निवडणुकांच्या दृष्टीने आमची सिद्धता चालू ! – श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र

लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका एकाच वेळी आल्यास त्यादृष्टीने आमची सिद्धता चालू आहे. या दोन्ही निवडणुका एकत्रित झाल्यास काही प्रमाणात अधिक ‘ईव्हीएम्’ यंत्रे लागतील. एका ईव्हीएम् यंत्रात १५ राजकीय पक्षांची नोंद ठेवता येते.

भाजपच्‍या १५२ जागा निवडून येतील ! – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्‍यक्ष, भाजप

वर्ष २०२४ मध्‍ये होणार्‍या राज्‍याच्‍या निवडणुकांमध्‍ये भाजपच्‍या ८० टक्‍के म्‍हणजे १५२ जागा निवडून येतील. भाजप क्रमांक १ चा पक्ष असेल आणि महायुतीचे २०६ पेक्षा अधिक आमदार निवडून येतील.

धर्माचरण आणि धर्मरक्षण यांतून हिंदु राष्ट्राकडे वाटचाल !

गोमंतकाच्या पावनभूमीत १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत अत्यंत उत्साहात पार पडलेल्या एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’, म्हणजेच ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त देश-विदेशातील मान्यवरांनी विविध विषयांवर विचारमंथन केले.

‘विकसित भारत २०४७’चे उद्दिष्ट गोवा सर्वांत अगोदर गाठणार ! – ओम बिर्ला, अध्यक्ष, लोकसभा

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गोवा विधानसभा सभागृहात आजी-माजी आमदार, सरपंच, उपसरपंच, नगरसेवक, जिल्हा पंचायत सदस्य यांना ‘विकसित भारत  २०४७ : लोकप्रतिनिधींची भूमिका’ या विषयावर संबोधित केले.

#Exclusive : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच दिव्यांग आणि वृद्ध यांना घरबसल्या मतदान करता येणार !

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अशा प्रकारे प्रथमच प्रयोग केला जात आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये दिली.

गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागांवर भाजपलाच विजयी करा !

आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर आणि दक्षिण गोवा मतदारसंघांमध्ये भाजपलाच विजयी करावे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फर्मागुडी येथे झालेल्या भाजपच्या प्रचारसभेत केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे महंमद फैजल यांच्या खासदारकीचे निलंबन मागे !

केरळमधील कवरत्ती न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास आणि १ लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती; मात्र त्यानंतर केरळ उच्च न्यायालयाने २५ जानेवारी या दिवशी त्यांची शिक्षा रहित केली होती.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचा क्षमा मागण्यास नकार !

संसदेतच एका खासदाराविषयी अपशब्द वापरण्यातून खासदारांची नैतिकता किती शिल्लक आहे, हे लक्षात येते !

विरोधकांना देशाची क्षमता आणि सामर्थ्‍य यांच्‍या वाढीमुळे निराशा ! – पंतप्रधान मोदी

काँग्रेसच्‍या काळात देशात आतंकवाद, हिंसाचार आणि घोटाळे वाढल्‍याचा आरोपही त्‍यांनी केला. ‘पायाखाली भूमी नाही, असे असतांनाही तुम्‍हाला त्‍याची जाणीव नाही’, असा टोलाही त्‍यांनी विरोधकांना लगावला.