अधीर रंजन चौधरी यांनी मणीपूरला लोकसभेतच आंतरराष्ट्रीय सूत्र बनवले !
नवी देहली – अधीर रंजन चौधरी यांनी १० ऑगस्ट या दिवशी मणीपूर राज्यातील हिंसाचाराला जागतिक स्तरावर नेऊन ठेवले. ते म्हणाले की, जागतिक स्तरावर मणीपूरचा हिंसाचार ‘यादवी युद्धा’प्रमाणे चर्चिला जात आहे. मणीपूरचा हिंसाचारावर युरोपीय संसद, तसेच अमेरिकाही चर्चा करत आहे. मणीपूरचा विषय हा एखादे राज्य अथवा राष्ट्र यांच्यापुरता मर्यादित राहिला नसून तो जागतिक पटलावर गेला आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी यावर हस्तक्षेप घेणे अत्यावश्यक झाले आहे.
कपिल सिब्बल यांची राष्ट्रघातकी मागणी
अशातच काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी राष्ट्रविरोधी वक्तव्य करत इंग्लंडमध्ये ज्या प्रकारे ‘ब्रेक्झिट’साठी (ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी) जनमत घेण्यात आले, तसे जनमत काश्मीरमध्येही घेण्यात यावे, असे सर्वोच्च न्यायालयात म्हटले. भारताचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांनी त्यांची ही मागणी फेटाळून लावली. (अशी राष्ट्रविरोधी वक्तव्ये करणार्यांना जनता कायमची घरी बसवेल, यात संशय नाही ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|