पिंपळगाव बहुला (जिल्हा नाशिक) येथील पंचायत संघटनेच्या बैठकीत चेतावणी !

नाशिक – देशाच्या २३ राज्यांत संघटनेचे जाळे असून सरकार पाडण्याची शक्ती संघटनेने निर्माण केली आहे. देश आणि राज्य यांतील गढूळ राजकारणामुळे निवडणुका होत नाहीत. ८५ टक्के लोकप्रतिनिधी सध्या घरी बसले आहेत. (असे आहे तर जनतेने लोकप्रतिनिधींना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यावी लागेल ! – संपादक) लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्याविना सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणार नाही. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका यांच्यावरच बहिष्कार घालावा लागेल, अशी चेतावणी राष्ट्रीय नगरसेवक परिषद अन् राष्ट्रीय जिल्हा पंचायत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे पाटील यांनी येथे दिली. १० सप्टेंबर या दिवशी जिल्ह्यातील पिंपळगाव बहुला येथे आयोजित राष्ट्रीय नगरसेवक परिषद आणि राष्ट्रीय जिल्हा पंचायत असोसिएशन प्रदेशाध्यक्ष पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !