आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्‍कार घालू !

असे आहे तर जनतेने लोकप्रतिनिधींना त्‍यांच्‍या कर्तव्‍याची जाणीव करून द्यावी लागेल !

अंतत: ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात होणार राष्ट्रव्यापी कायदा !

लव्ह जिहादसारख्या हिंदूंच्या मुळावर उठलेल्या षड्यंत्राच्या विरोधात केंद्रशासनाने घेतलेला हा निर्णय स्तुत्य आहे !

(म्हणे) ‘मणीपूरचा विषय हा भारतापुरता राहिला नसून जागतिक पटलावर पोचला !’ – अधीर रंजन चौधरी

मणीपूरच्या सूत्रावरून जागतिक स्तरावर भारतविरोधी कथानक रचले जात असून काँग्रेस पक्षही त्याचाच भाग आहे, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ?

(म्हणे) ‘मणीपूरमध्ये भारतमातेची हत्या करण्यात आली !’ – राहुल गांधी

राहुल गांधी यांची लोकसभेत गरळओक
पंतप्रधान मोदी यांच्यावरही आरोप !

जनतेच्या ‘डिजिटल डेटा’चा अपवापर करणार्‍या संस्थांना ५० ते २५० कोटी रुपयांपर्यंत होणार दंड !

विधेयकानुसार जनतेचा वैयक्तिक डिजिटल डेटा चोरल्याचे अथवा त्याचा अपवापर केल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित संस्थेला ५० ते २५० कोटी रुपये दंड भरावा लागणार आहे.

सदस्यांच्या वागण्यात सुधारणा होत नाही, तोपर्यंत लोकसभेचे कामकाज चालवण्यास नकार ! – लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला

अशा निर्णयामुळे गदारोळ घालणार्‍या सदस्यांवर काहीही परिणाम होणार नाही. याऐवजी लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारात गदारोळ करणार्‍या सदस्यांना संसदेबाहेर काढण्याचे, निलंबित करण्याचे आदी निर्णय घेणे अपेक्षित आहे.

संसदेत अविश्‍वास प्रस्तावावर ८ ऑगस्टपासून चर्चा

मणीपूरमधील हिंसाचारावरून संसदेत १ ऑगस्ट या दिवशीही विरोधी पक्षांनी गदारोळ घातल्याने राज्यसभा आणि लोकसभा यांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.

विरोधकांचा केंद्र सरकारविरुद्धचा अविश्‍वास प्रस्ताव लोकसभेच्या अध्यक्षांनी स्वीकारला !

मणीपूरमध्ये चालू असलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी विरोधी पक्षांनी लोकसभेमध्ये २६ जुलै या दिवशीही केंद्र सरकारवर टीका करत मोदी सरकारच्या विरोधात अविश्‍वास प्रस्ताव मांडला. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तो स्वीकारून ‘चर्चेचा दिनांक नंतर निश्‍चित केला जाईल’, असे सांगितले.

वर्ष २०२३ च्या अखेरीस देशातील मुसलमानांची लोकसंख्या अनुमाने २० कोटी होईल ! – मंत्री स्मृती इराणी

वर्ष २०२३ च्या अखेरीस देशातील मुसलमानांची लोकसंख्या अनुमाने २० कोटी होईल, असे केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितले. तृणमूल काँग्रेसच्या खासदार माला रॉय यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली.

मणीपूरच्या प्रकरणावरून संसदेचे कामकाज काही वेळासाठी स्थगित !

सरकार चर्चेस सिद्ध असतांनाही विरोधी पक्षांकडून गदारोळ ! यावरून विरोधी पक्षांना मणीपूरच्या घटनेविषयी सुख-दुःख नाही, तर त्यांना यावरून  राजकारण करून सरकारला जाणीवपूर्वक वेठीस धरायचे आहेत, असेच दिसून येते !