वर्ष २०१४ च्या तुलनेत विदर्भात १० लाख ९८ सहस्र मतदार वाढले !
निवडणूक आयोगाने नुकत्याच घोषित केलेल्या मतदारांच्या आकडेवारीमध्ये हे आढळून आले आहे. वर्ष २०१४ मध्ये या मतदारसंघामधील मतदारांची संख्या ८४ लाख ५६ सहस्र २९ इतकी होती.
निवडणूक आयोगाने नुकत्याच घोषित केलेल्या मतदारांच्या आकडेवारीमध्ये हे आढळून आले आहे. वर्ष २०१४ मध्ये या मतदारसंघामधील मतदारांची संख्या ८४ लाख ५६ सहस्र २९ इतकी होती.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता राऊत यांनी शिधा म्हणून व्हिस्की आणि बिअर देण्याचे आश्वासन मतदारांना दिले आहे.
मुख्यमंत्री असतांना सुशीलकुमार शिंदे यांनी आतंकवाद प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेल्या सोलापूरमधील १२ आतंकवाद्यांना वाचवत तुष्टीकरणाचे राजकारण केले, असा आरोप सातपुते यांनी केला आहे
गेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत समितीने लाखापेक्षा अधिक मते मिळवल्याने समितीने मराठी भाषिकांची मते कायम रहावीत, यासाठी आगामी लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
याच मतदारसंघातून सलग ५ वेळा निवडून आलेल्या भावना गवळी यांनी वेळोवेळी या मतदारसंघावर आपला दावा केला आहे. त्यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याचेही स्पष्ट केले; पण त्या जागेवर अद्याप उमेदवार ठरला गेलेला नाही.
४६ वर्षीय बर्वे यांनी स्वत:च्या उत्पन्नाचा स्रोत शेती आणि शेतीपूरक व्यवसाय असा दाखवला आहे. यातून वर्षाला ११ लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळणार्या बर्वे यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती सव्वाचार कोटी रुपयांहून अधिक आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याविषयीची माहिती दिली.
पंचगंगा नदी प्रदूषण दूर करणे, श्री महालक्ष्मीदेवी मंदिर विकास आराखड्याला गती देणे यांसह कोल्हापूरच्या विकासाची अनेक महत्त्वाची कामे यापुढील काळात केली जातील, असे प्रतिपादन कोल्हापूर मतदारसंघातील भाजप-सेना युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केले.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या उमेदवारी अर्जांच्या पडताळणीमध्ये राज्यातील ५ मतदारसंघांतून एकूण १८१ अर्ज प्राप्त झाले होते. यांतील ११० उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाद्वारे ही माहिती देण्यात आली.
सकल मराठा समाजाने येथे बोलावलेल्या बैठकीत मोठी हाणामारी झाली आहे. ही बैठक मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार बोलावण्यात आली होती; पण त्यात वाद निर्माण झाला.