यवतमाळ – लोकसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यातील निवडणुकांची अधिसूचना लागू झाली आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाकडून संजय देशमुख यांची उमेदवारी घोषित झाली आहे, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुभाष पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच मतदारसंघातून सलग ५ वेळा निवडून आलेल्या भावना गवळी यांनी वेळोवेळी या मतदारसंघावर आपला दावा केला आहे. त्यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याचेही स्पष्ट केले; पण त्या जागेवर अद्याप उमेदवार ठरला गेलेला नाही.