मुंबई – शरद पवार यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या लोकसभा उमेदवारांची पहिली सूची घोषित करण्यात आली आहे. यामध्ये बारामती येथून सौ. सुप्रिय सुळे, शिरूर येथून अमोल कोल्हे, नगर येथे नीलेश लंके, वर्धा येथून अमर काळे, तर दिंडोरी येथून भास्करराव भगरे यांना संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याविषयीची माहिती दिली.