मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मुंबई, पुणे आणि संभाजीनगर येथील ‘अ‍ॅमेझॉन’च्या कार्यालयांची तोडफोड

‘अ‍ॅप’मध्ये मराठीचा उपयोग करण्यावरून आडमुठेपणा करणार्‍या ‘अ‍ॅमेझॉन’च्या विरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

व्याकरणाच्या चुका करणारा जगातील एकमेव देश भारत ! उत्तरदायींना शिक्षा करा !

‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणार्‍या ‘दिलीप बिल्डकॉन’ या आस्थापनाकडून लावण्यात आलेल्या पथदर्शक आणि माहितीदर्शक फलकांवरील मराठी शब्द अत्यंत अशुद्ध असल्याने भाषाप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे.’

कॅसिनो वाढवून गोव्याचे ‘माकाव’ केले, तरी मातृभाषेच्या संदर्भात गोव्याचा नागालँड होऊ देणार नाही ! – भा.भा.सु.मं.

मातृभाषेच्या संदर्भात गोव्याचा ‘नागालँड’ करण्याच्या या सरकारच्या कारस्थानाच्या विरोधात भारतीय भाषा सुरक्षा मंच (भा.भा.सु.मं.) निकराचा लढा देईल, अशी चेतावणी भा.भा.सु.मं.चे नवनियुक्त राज्य निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संस्कृत हीच संस्कृती !

इंग्रजी बोलणार्‍यांच्या देशात कार्यक्रमांचा प्रारंभ संस्कृत भाषेतून होत आहे आणि ती पाश्‍चात्त्य भाषांना वरचढ ठरत आहे. ‘भाषा मरता, देश आणि संस्कृतीही मरते, तर भाषा जगता देश आणि संस्कृती यांना ऊर्जितावस्था येते’, असे म्हटले जाते. जगभरात संस्कृतचे केले जाणारे गुणगान ही आगामी हिंदु राष्ट्राची नांदीच ठरणार आहे, यात शंकाच नाही.

हिंदी साहित्य भारतीच्या गोवा समितीची स्थापना

हिंदी साहित्य भारतीच्या गोवा समितीची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी केंद्रीय विद्यालय मांडवीचे प्राचार्य रवि प्रताप सिंह यांची, तर दाबोळी येथील स्पेक्ट्रम करिअर अकादमीचे निर्देशक डॉ. कमलेश मिश्रा यांची सरचिटणीसपदी निवड झालेली आहे.