कॅनडा आरोपांविषयी माहिती देत असेल, तर भारत चर्चेला सिद्ध ! – डॉ. जयशंकर

कुणाची हत्या करण्याची आमच्या सरकारची नीती नाही; मात्र जर कॅनडा आमच्या समवेत काही माहितीची देवाण घेवाण करण्यास सिद्ध असेल, तर आम्ही त्यावर विचार करण्यास सिद्ध आहोत.

कॅनडाकडून आतंकवाद, कट्टरतावाद आणि हिंसाचार यांना मोकळीक !

जे आतंकवाद आणि फुटीरतावाद यांची भाषा करतात त्यांच्यावर सरकारने  कारवाई केली पाहिजे. ‘फुटीरतावाद्यांचे विचार हे सर्व शीख समाजाचे विचार आहेत’, असे समजण्यात येऊ नये. 

 ३१ वर्षांपूर्वी धाडीच्या नावाखाली अन्याय आणि बलात्कार करणार्‍या तमिळनाडूतील २१५ अधिकार्‍यांना शिक्षा

अधिकाराचा अशा प्रकारे अपवापर करणार्‍यांना आजन्म कारागृहात टाकण्याचीच शिक्षा करणे आवश्यक होते ! बलात्कार आणि अत्याचार केल्याच्या प्रकरणात ३१ वर्षांनी मिळालेला न्याय हा अन्यायच !

देयक संमतीतील दलालीप्रकरणी लाचखोर उपअभियंत्‍या सुभद्रा कांबळे यांना अटक !

प्रशासकीय पातळीवर अनेक वेळा अशा प्रकारची अटक होते; मात्र पुढे कठोर कारवाई होत नसल्‍याने हे प्रकार थांबत नाहीत. त्‍यासाठी लाच मागणार्‍यांच्‍या विरोधात कठोर कारवाईची तरतूद हवी !

‘पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी’ आणि महापालिका यांच्या वतीने शहरात ५ सहस्रांहून अधिक छायाचित्रक बसवले !

नागरिकांमध्ये नियम पालन करण्याची मानसिकता निर्माण करण्यासाठी कठोर शिक्षेसह त्यांची नीतीमत्ता उंचावण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणेही आवश्यक !

सातारा नगर परिषदेकडून ‘उपयोगकर्ता शुल्का’ची आकारणी !

हा कर तात्काळ मागे घेण्यात यावा. नागरिकांची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. याविषयी नगर विकास विभागाशी चर्चा करून योग्य तो निर्णय व्हावा, अशी सातारावासियांची अपेक्षा आहे.

सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य यांचे स्थानांतर !

उज्ज्वल वैद्य यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लाच घेणार्‍यांवर कडक कारवाई करत कार्यालयात येणार्‍या प्रत्येक तक्रारीची नोंद घेत त्यांनी ६ मासांत ७ मोठ्या कारवाया केल्या.

पिंपरी (पुणे) येथे ३ मासांत डेंग्‍यूचे १४० बाधित रुग्‍ण !

महापालिकेच्‍या वतीने आरोग्‍य कार्यकारी अधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली कीटकजन्‍य आजार नियंत्रणासाठी ‘मॉस्‍क्‍युटो अबेटमेंट समिती’ची स्‍थापना केलेली आहे.

कॅनडामध्ये लोकशाहीच्या नावाखाली हिंसाचाराचे समर्थन केले जात आहे !

स्वतःच्या राजकीय लाभासाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो खलिस्तान्यांसमोर केवळ झुकलेच नाही, तर त्यांनी लोटांगण घातले आहे, हे संपूर्ण जग पहात आहे.

अवैध स्थलांतर रोखण्यासाठी युरोपीय संघाच्या धोरणांमध्ये पालट आवश्यक ! – हंगेरीचे पंतप्रधान

‘आम्ही आमच्या सीमांचे रक्षण करू; परंतु आम्हाला अवैध स्थलांतर थांबवायचे असेल, तर युरोपीय संघाच्या धोरणांमध्ये पालट करणे आवश्यक आहे’, -हंगेरीचे पंतप्रधान विक्टर ऑर्बन